('पीके' आणि 'हॅपी न्यू इयर' सिनेमाचे पोस्टर)
मुंबई-
आमिर खानचा बहुचर्चित 'पीके' सिनेमा सिल्व्हर स्क्रिनवर दाखल झाला आहे. सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी या सिनेमाने
बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई आणि नवीन रेकॉर्ड प्रस्थापित करेल, अशी आशा व्यक्त केली गेली होती. मात्र हा सिनेमा पहिल्या दिवशी 27 ते 30 कोटींच्या घरातच व्यवसाय करु शकला. एवढा गल्ला जमवूनसुद्धा आमिर शाहरुखचा रेकॉर्ड मोडित काढण्यात अपयशी ठरला आहे. यावर्षी रिलीज झालेल्या
शाहरुख खानच्या 'हॅपी न्यू इयर' या सिनेामने ओपनिंग डेला तब्बल 44.97 कोटींचा व्यवसाय केला होता.
बॉक्स ऑफिसच्या आकड्यांकडे 'पीके', 'हॅपी न्यू इयर'पेक्षा मागे ठरला. मात्र या सिनेमाला माउथ पब्लिसिटीचा चांगला फायदा मिळत आहे. समीक्षक आणि प्रेक्षकांनी सिनेमाला पसंतीची पावती दिली आहे. येणा-या दिवसांत हा सिनेमा अनेक रेकॉर्ड्स प्रस्थापित करु शकतो.
'पीके'च्या शुक्रवारच्या बिझनेसविषयी ट्रेड पंडीत आमोद मेहरा आणि विनोद मिरानी यांनी divyamarathi.comला सांगितले.
आमोद मेहराः शुक्रवारी सुटी नसतानादेखील सिनेमाने चांगला बिझनेस केला आहे. बँग बँग,
किक हे सिनेमे सुटीच्या दिवशी रिलीज झाले होते. मात्र हे दोन्ही सिनेमा 25 कोटींपेक्षा जास्त व्यवसाय करु शकले नव्हते.
विनोद मिरानीः सिनेमाकडून जेवढी अपेक्षा व्यक्त केली गेली होती, तितका बिझनेस तो करु शकला नाही. मात्र थिएटरमध्ये त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
कोमल नहाटाः सोशल सिनेमा असल्यामुळे पीकेची कमाई 25.6 कोटी झाली. सिनेमाला माउथ पब्लिसिटीचा फायदा मिळतोय.
आपल्याच सिनेमापेक्षा मागे राहिला आमिर...
गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात आमिरचा 'धूम 3' रिलीज झाला होता. या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 36 कोटींचा व्यवसाय केला होता. इतकेच नाही तर ओव्हरऑल बिझनेस 500 कोटींच्या घरात झाला होता. हा सिनेमा बॉलिवूडच्या इतिहासात सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. आता आमिर पीकेच्या माध्यमातून स्वतःचाच रेकॉर्ड मोडित काढणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'पीके' कुणापेक्षा निघाला पुढे आणि कुठे राहिला मागे...