आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • “PK” Funnies: Watch How Aamir And The Barber Got The Perfect Shot

Video: \'पीके\'च्या या सीनसाठी घेतले 12 टेक, प्रत्येकवेळी बार्बरने आमिरला मारल्या लाथा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('पीके'चा सीन)
मुंबई: आमिर खानचा 'पीके' सिनेमा पोस्टर्स आणि टीजरमुळे चांगलाच चर्चेत आहे. सिनेमाच्या टीजरमध्ये मिस्टर परफेक्शनिस्टचा प्रत्येक शॉट परफेक्ट दिसत आहे. परंतु टीजरमध्ये आमिर आणि बार्बर यांच्यात जो सीन दिसत आहे, त्यासाठी एकदा-दोनदा नव्हे 12 वेळा टेक घेण्यात आले आहेत. बार्बरचे पात्र नरवालने साकारले आहे.
आमिरला आपल्या प्रत्येक सिनेमात एक-एक शॉट्स परफेक्ट देण्याची इच्छा असते. असेच काही त्याच्या 'पीके'मध्येसुध्दा दिसून येत आहे. सिनेमाच्या टीजरमध्ये ज्या सीनमध्ये बार्बर आमिरला लाथ मारत आहे, तो सीन 10-12 वेळा चित्रीत करण्यात आला. सिनेमाच्या मेकिंगदरम्यान व्हिडिओ यू-ट्यूबवर शेअर करण्यात आला. त्यामध्ये आमिर आणि बार्बर यांच्यात एंटरटेन्मेंट दाखवण्यात आले आहे.
आमिरला बार्बरने 12वेळा लाथ मारली
अजय (बार्बर)ने सांगितले, की या सीनसाठी जवळपास 12 वेळा टेक घेण्यात आले. कधी बार्बरचा पायजमा ढिला झाला तर कधी जास्त फिट. त्यामुळे शॉट परफेक्ट येत नव्हता. या सीनमध्ये आमिर बार्बरचा पायजमा मागच्या बाजूने ओढतो आणि बार्बर त्याला लाथ मारतो. या मेकिंग व्हिडिओचा कालवधी 1 मिनिट 46 सेकंद आहे. या व्हिडिओमध्ये बार्बरवर फोकस करण्यात आले आहे. या सीनच्या शेवटी बार्बर आमिरला लाथ मारतो. त्यामुळे असे म्हटेल जाऊ शकते, की 12 टेक घेतल्यानंतर आमिरला प्रत्येक वेळी बार्बरची लाथ खावी लागली असेल.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या शॉर्ट्सच्या मेकिंगचा व्हिडिओ आणि छायाचित्रे...