आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनेक हिंदी सिनेमातील छोट्या-छोट्या संकल्पनांचा कॉकटेल आहे 'PK', जाणून घ्या कसे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोः 'पीके' आणि 'ओह माय गॉड' सिनेमातील दृश्य)
मुबंईः अखेर हा 'पीके' कोण आहे, यावरुन पडदा उठला आहे. या सिनेमात अनुष्का शर्मा, संजय दत्त यांनी कोणत्या भूमिका साकारल्या आहेत, हे रिलीजपूर्वीच जगजाहिर झाले होते. मात्र हा 'पीके' कोण आहे, हे सिनेमाच्या रिलीजनंतरच कळले. 'पीके' एक एलियन असून पृथ्वीवर अवतरल्यानंतर त्याला पीके हे नाव मिळतं.
राजकुमार हिराणी यांनी उत्कृष्टरित्या 'पीके'ला पडद्यावर साकारले आहे. सिनेमातील आमिरने साकारलेले पात्र, संवाद आणि कॉश्च्युमसोबतच कहाणी मजेशीर आणि संदेश देणारी आहे. दरम्यान हा सिनेमा बघताना काही जुन्या सिनेमांचीही आठवण आपल्याला होते. विशेषतः 2012मध्ये रिलीज झालेल्या 'ओह माय गॉड' या सिनेमाची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. या सिनेमात ब-याच अंशी 'ओह माय गॉड'ची झलक बघायला मिळते. मात्र दोन्ही सिनेमांचा उद्देश आणि संदेश वेगवेगळा आहे.
साम्य क्रमांक 1
'ओह माय गॉड'ची संकल्पना...

'ओह माय गॉड' या सिनेमात कांजी लालजी मेहता (परेश रावल) नैसर्गिक आपत्तीमुळे दुकान जमीनदोस्त होतं. त्यामुळे नुकसानभरपाई मिळावी यासाठी तो कोर्टात देवाविरुद्ध खटला दाखल करतो. कांजी म्हणतो, की देवाची पूजा मनापासून करा, त्यासाठी ढोंग करण्याची गरज नाही. मंदिरात जाऊन तेल, दूध चढवण्यापेक्षा ते गरीबांना द्या.
'पीके'मध्ये आमिरच्या लॉकेटच्या माध्यमातून आपल्या ग्रहावरील लोकांच्या संपर्कात राहतो, ते चोरीला जातं. तेव्हा लोक त्याला देवाची पूजा करण्याचा सल्ला देतात. तो मंदीर, मश्जिद, गुरुद्वारा, गिरजाघरात जाऊन पूजाअर्चा करतो, मात्र त्याला त्याचे लॉकेट मिळत नाही. नंतर त्याला कळतं, की धार्मिक म्हणवणारे लोक आपला हेतू साध्य करण्यासाठी घाबरलेल्या लोकांचा फायदा घेतात.
'पीके'मध्ये आणखी कोणकोणत्या सिनेमातील साम्य आढळून आले, ते जाणून घ्या पुढील स्लाईड्समध्ये...