आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PK Is Inspired By The Ideas Of Mahatma Gandhi: Rajkumar Hirani

विरोधामुळे दु:खी झाले हिराणी, म्हणाले- गांधींच्या विचारांनी प्रेरित आहे सिनेमा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशातील अनेक थिएटरमध्ये तोडफोड आणि अनेक धार्मिक संघटनांकडून केल्या जाणा-या प्रदर्शनानंतर दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांनी आपले मौन तोडले आहे. त्यांनी यावर एक पत्र लिहून सांगितले, 'आमचा सिनेमा 'पीके'च्या विरोधात काही संघटनांनी विरोध दर्शवलेल्या विरोधाने मी खूप दु:खी आणि चिंतेत आहे. आमच्या सिनेमाच्या संपूर्ण टीमच्या वतीने, मी स्पष्ट करतो, की आम्ही सर्व धर्म आणि श्रध्दांचा आदर करतो. आमचा सिनेमा संत कबीर आणि महात्मा गांधी यांच्या विचारांनी प्रेरित आहे.'
आमचा सिनेमा सांगतो, की या ग्रहावर राहणारे सर्व लोक एकसारखे आहेत. कुणामध्ये काहीच फरक नाहीये. एवढेच नव्हे, मी अद्वैताच्या विचारांचा आदर करतो, त्याचा अर्थ होतो, की एकसारखे असणे. हा भारतीय संस्कृती, विचार आणि धर्मचा केंद्रीय विचार आहे. मला गे पाहून दु:ख होतय, की एक सिनेमा जो महान हिंदू सिध्दांताला दर्शवतो, त्यावरच हिंदुत्वला बेइज्जत केल्याचा आरोप लावला जातोय.
मी त्या लाखो धार्मिक लोकांची आभार मानतो, ती ज्यांनी सिनेमा पसंत केला आणि म्हणाले, की हा सिनेमा ख-या धर्मावर भाष्य करतोय. मी विरोध करणा-या सर्व संघटनांना अपील करतो, की सिनेमाला परिपूर्ण बघा, सिनेमातील केवळ दृश्यच पाहू नका.
आमचा हेतू कुणाला दु:ख पोहोचवण्याचा नाहीये. मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो, की मी सर्व धर्माचा आदर करतो आणि आम्ही सर्व धर्मांच्या श्रध्देचा सन्मान करतो.
मी वसुधैम कुटंबकम- संपूर्ण विश्व एक कुटुंब आहे. मी महान विचारांचा आदर करतो. हिंदुत्व, इस्लाम, इसाइयत आणि इतर सर्व धर्म प्रेम आणि आदर करण्याचा शिक्षा देते. सिनेमाचा हेतू याच विचारांना प्रोत्साहित करण्याचा आहे.