(फाइल फोटो- बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा)
मुंबई: अभिनेता
आमिर खानने
आपल्या '
पीके' या आगामी सिनेमाचे फस्ट पोस्टर लाँच करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. आता आमिर नव्हे अनुष्काची वेळ आहे सर्वांना आश्चर्यचकित करण्याची. 16 ऑक्टोबर रोजी अनुष्का ट्रान्जिस्टर पकडून आपल्याला दिसणार आहे, असे आम्ही नव्हे स्वत: अनुष्का सांगतेय.
अनुष्काने एक व्हिडिओ पोस्ट करून टि्वटरवर लिहिले, 'मला एकटक पाहायचे आहे तर त्याआधी हे पाहा. या व्हिडिओमध्ये अनुष्का म्हणतेय, बहुत टुकुर-टुकुर देख लिया पीके को. अब मै आर ही हू Whatsappपे 16 अक्टूबर को ट्रान्जिस्टर पहन के.' या पोस्टसाठी टीमने 7710095890 हा नंबर दिला आहे. या माध्यमातून पीकेची जाहिरात केली जाणार आहे.
हा पहिला सिनेमा नाहीये, ज्याचे पोस्टर किंवा टीजर फोनवर पाहायला मिळणार आहे. यापूर्वी शाहरुखने आपल्या 'हॅपी न्यू इअर'चा ट्रेलर लाँच केला होता.
आमिर खानच्या ट्रान्जिस्टरच्या पोस्टरने बरेच वाद उभे केले होते. हे प्रकरण कोर्टापर्यंत गेले
होते. आता अनुष्का ट्रान्जिस्टरच्या लूकमध्ये कशी दिसणार हे पाहणे रंजक ठरणार आहे. सिनेमाचे आतापर्यंत 4 पोस्टर लाँच झाले आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अनुष्का शर्माचा व्हिडिओ मॅसेज आणि 'PK'चे इतर पोस्टर्स...