आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'पीके\'ने रचला हिंदी सिनेसृष्टीत नवा इतिहास, जमवला 300 कोटींचा गल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आमिर खानच्या वादात अडकलेल्या 'पीके'ने 300 कोटींची कमाई करून हिंदी सिनेसृष्टीत नवा इतिहास रचला आहे. आमिरने स्वत:च्याच 'धूम 3'चा विक्रम मोडित काढत हा रेकॉर्ड रचला आहे. या सिनेमाची रिलीजपूर्वीच चर्चा होती. सिनेमा 20 डिसेंबर रोजी रिलीज झाला. रिलीज झाल्यापासून दिवसेंदिवस तिकीटबारवर सिनेमाच्या कमाईचा आकडा वाढत जात आहे.
2008मध्ये आलेल्या आमिरचा 'गजनी' 100 कोटी कमाई करणारा पहिला सिनेमा ठरला होता. त्यानंतर 2009मध्ये रिलीज झालेला '3 इडियट्स' 200 कोटींचा गल्ला जमवणारा पहिलाच सिनेमा होता. अशातच आता 'पीके'ने 300 कोटींचा क्लब तयार केला आहे. हा एक नवा इतिहास पीकेने रचला आहे. सिनेमा पंडित तरण आदर्श यांनीसुध्दा सिनेमाच्या व्यवसायविषयी टि्वट केले आहे.
सिनेमात आमिर खानशिवाय, अनुष्का शर्मा, सुशांतसिंह राजपूत, बोमन इराणी यांच्या मुख्य भूमिका आहेत. 'पीके'वर धार्मिक भावना दुखावल्या अशा प्रखर टिकादेखील होत आहेत. देशभरात पीकेच्या विरोधात निदर्शनेदेखील करण्यात आली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा तरण आदर्श यांनी केलेले टि्वट...