आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 'PK’ Will Be India’S Biggest Release With 5200 Screens

आमिरचा 'PK' बनवणार रेकॉर्ड, जमवू शकतो 300 कोटींचा गल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('PK'चे पोस्टर)
मुंबईः आमिर खान स्टारर 'पीके' हा आगामी सिनेमा बॉलिवूडमध्ये एक नवीन रेकॉर्ड बनवण्याच्या तयारीत आहे. बातमी आहे, की हा सिनेमा भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासातील सर्वात मोठी रिलीज सिद्ध होणार आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित आणि विधू विनोद चोप्रांच्या निर्मितीत बनलेला हा सिनेमा भारतात तब्बल 5200 स्क्रिन्सवर तर परदेशात 820 स्क्रिन्सवर रिलीज होणार आहे. एवढी मोठी रिलीज मिळवणारा हा पहिला हिंदी सिनेमा आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात हा सिनेमा रिलीज होत असल्यामुळे निर्मात्यांना त्याकडून ब-याच अपेक्षा आहेत. सिनेमाच्या टीमने आशा व्यक्त केली आहे, की हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तीनशे कोटींची कमाई करेल. या सिनेमात आमिर खानसोबत अनुष्का शर्मा, संजय दत्त आणि सुशांत सिंह राजपूत महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. येत्या 19 सप्टेंबर रोजी हा सिनेमा थिएटरमध्ये दाखल होतोय.
एक नजर टाकुया बॉलिवूडमधील आत्तापर्यंतच्या सर्वात मोठ्या रिलीजवर... क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...