('पीके'च्या गाण्यात 'ठकरी छोकरो'ता सीन)
मुंबई: आमिरच्या 'पीके'चे पहिले गाणे लाँच झाले आहे. हे गाणे दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका इव्हेंटमध्ये लाँच करण्यात आले. गाण्याचे बोल 'ठकरी छोकरो' आहे.
या गाण्याचा व्हिडिओसुध्दा खूप रंजक आहे. त्यामध्ये
आमिर खान आणि संजय दत्तसुध्दा दिसणार आहे. गाण्याला राजस्थानी गायक स्वरुप खानने आवाज दिला आहे. गाण्यात आमिरला मुलगा आणि मुलींमध्ये फरक समजत नाही. मुलींना ओळखण्यासाठी तो मुलींना स्पर्श करतो. त्यावेळी संजय दत्त त्याला गाणे म्हणून समजावून सांगतो. अलीकडेच पीकेचा ट्रेलर लाँच करण्यात आला. तो प्रेक्षकांच्या पसंतील पडल्याचे दिसते.
'पीके'चे दिग्दर्शन राजकुमार हिराणीने केले असून विधू विनोद चोप्रा यांनी निर्मित केला आहे. सिनेमात आमिरसोबत अनुष्का शर्मा, संजय दत्त आणि सुशांत सिंह राजपुत दिसणार आहे. हा सिनेमा 19 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये दाखल होत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा व्हिडिओ आणि छायाचित्रांमध्ये 'ठकरी छोकरो'मधील आमिरचा अंदाज...