आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराट हिरोसारखा दिसतो, आमिरने उडवली अनुष्काची खिल्ली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पत्रकार परिषदेत अनुष्का शर्मा आणि आमिर खान)
अहमदाबाद- 'पीके'च्या प्रमोशनसाठी अभिनेता आमिर खान, अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि दिग्दर्शक राजकुमार हिराणी अहमदाबादचे पाहूणे बनले होते. शहरातील थलतेज परिसरातील पीव्हीआर मल्टिप्लेक्स मध्ये या स्टार्सनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अनुष्का आणि विराट कोहली यांचा उल्लेख झाल्यानंतर अनुष्काची खिल्ली उडवत आमिर म्हणाला, 'विराट हिरोसारखा दिसतो.' आमिरच्या बोलणे ऐकून अनुष्का लाजली आणि हसलीसुध्दा.
विराटसोबत साखरपुडा आणि लग्नाच्या बातम्यांना अफवा सांगत अनुष्काने सांगितले, 'मी सध्या सिनेमांवर लक्ष केंद्रीत करत आहे.' आमिर खानला परफेक्शनिस्ट म्हटले जाते, यावर आपली प्रतिक्रिया देत आमिरने सांगितले, 'मी माझ्या स्वप्नांशी कधीच तडजोड करत नाही. मला नाही वाटत मी परफेक्शनिस्ट आहे. दिग्दर्शक माझ्याकडून चांगले काम करवून घेतात आणि राजकुमार हिराणी माझे आवडते दिग्दर्शक आहेत.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा पत्रकार परिषदेची छायाचित्रे...