(कुश आणि तरुणा यांच्या लग्नसोहळ्यातील खास छायाचित्रे)
मुंबईः बॉलिवूडमध्ये शॉटगन नावाने प्रसिध्द अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा भाऊ कुश रविवारी बोहल्यावर चढला. मुंबईतील ताज लँड हॉटेलमध्ये धुमधडाक्यात त्याचे लग्न झाले. या लग्नाला सिनेसृष्टीसह राजकारणातील दिग्गज आले होते.
कुशचे लग्न तरुणा अग्रवालसोबत झाले. ती लंडनच्या NRI कुटुंबातील आहे. भावाच्या लग्नात सोनाक्षी खूपच उत्साही आणि आनंदी दिसली. तिने हातावर काढलेल्या मेंदीचा फोटो टि्वटरवर शेअर केला.
शत्रुघ्न सिन्हा यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. लव-कुश ही मुलांची तर सोनाक्षी हे त्यांच्या मुलीचे नाव आहे. 31 वर्षीय कुश
आपल्या वडिलांचा सिनेमा आणि टीव्ही प्रॉडक्शनचा बिझनेस सांभाळतो, तर त्याचा जुळा भाऊ लव अभिनयात हात आजमावत आहे. शुत्रघ्न सिन्हा यांची लेक सोनाक्षी बॉलिवूडमधील नावाजलेली अभिनेत्री आहे.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला कुश आणि तरुणा यांच्या लग्नाची खास छायाचित्रे दाखवत आहोत. पुढील स्लाईड्समध्ये पाहा लग्नसोहळ्यातील खास क्षण...