आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Narendra Modi Will Not Attend Salman’S Sister’S Wedding

CONFIRMED: सलमानच्या बहिणीच्या लग्नात सहभागी होणार नाहीत पंतप्रधान नरेंद्र मोदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- सलमान खान आणि नरेंद्र मोदी)
मुंबई- काही दिवसांपूर्वीच सुपरस्टार सलमान खान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपली बहीण अर्पिताच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी गेला होता. मात्र मोदी या लग्नसोहळ्यात सहभागी होणार की नाही? यावर सस्पेन्स होता. divyamarathi.comला माहिती मिळाली, की नरेंद्र मोदी या लग्नात येणार नाहीये.
हैदराबादच्या पंचतारांकित फलकनुमा पॅलेसशी निगडीत एका सूत्राने हा खुलासा केला आहे. सूत्राच्या सांगण्यानुसार, 'अद्याप आम्हाला याविषयी कोणतीही माहिती मिळालेली नाही. याचा अर्थ असा, की पीएम मोदी लग्नात सहभागी होणार नाहीये. पंतप्रधान अथवा इतर व्हिआयपी पाहुण्यांच्या येण्याची माहिती आम्हाला मिळायला हवी होती. परंतु खान कुटुंबीयांकडून अशी कोणतीच माहिती मिळालेली नाहीये.'
अर्पिताचे आज अर्थातच 18 नोव्हेंबर रोजी बॉयफ्रेंड आयुष शर्मासोबत लग्न होणार आहे. सलमानने मोदी यांची भेट घेतल्यानंतर अंदाज व्यक्त केले जात होते, की पंतप्रधान नरेंद्र मोदी या लग्नात सहभागी होणार आहेत. परंतु सध्या ते परदेशी दौ-यावर असल्याने या लग्नाला येऊ शकणार नाहीत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सलमानने अर्पिताच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी मोदींची घेतलेल्या भेटीची छायाचित्रे...