आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला संघटनांचा विरोध, आमिर खानचे 'ते' पोस्टर मुंबईत पोलिसांनी काढले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड स्टार मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या 'पीके' या चित्रपटाच्या पोस्टरवरुन मुंबईत महिला संघटना आक्रमक झाल्या आहेत. गेल्या आठवड्यात या चित्रपटाचे पोस्टर रिलिज करण्यात आले होते. महिला संघटनांच्या विरोधानंतर सार्वजनिक ठिकाणांहून ते उतरवण्यात आले आहे.
आमिरच्या 'पीके' चित्रपटाचे पोस्टर पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. त्यात तो न्यूड उभा असल्याचे दिसते. त्याच्या हातात फक्त रेडिओ आहे. महिला संघटनांच्या विरोधानंतर एका चित्रपटगृहातून आणि गेटी गॅलक्सीच्या लाउन्जमधील 'पीके'चे पोस्टर पोलिसांनी काढले आहे. हे पोस्टर सार्वजनिक ठिकाणी लावण्याच्या लायकीचे नसल्याचा आरोप महिला संघटनांनी पोलिसांना दिले्ल्या तक्रारीत केला आहे.
'पीके' या चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी असून विधु विनोद चोपडा निर्माता आहेत. गेल्या आठवड्यात या चित्रपटाचे पोस्टर रिलिज झाल्यानंतर दुसर्‍याच दिवशी कानपूर न्यायालयात याविरोधात खटला दाखल झाला आहे.

( छायाचित्र - 'पीके' चित्रपटाचे पोस्टर, ज्यात आमिर न्यूड उभा आहे. )