आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pooja Sawant Won Jallosh Suvarnayugacha Grand Finale

...आणि जल्लोष सुवर्णयुगाची आजची सुपरस्टार ठरली पूजा सावंत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्या क्षणाची सगळे प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते तो क्षण अखेर आला आणि पूजा सावंत ठरली जल्लोष सुवर्णयुगाची आजची सुपरस्टार. जल्लोष सुवर्णयुगाचा महाअंतिम सोहळा अलीकडेच धुमधडाक्यात पार पडला.
या सोहळ्यात नृत्याच्या विविध रंगांची उधळ करत पूजाने हा मान मिळवला. 1 लाख 50 हजार रुपये आणि ट्रॉफी हे पूजाला पारितोषिकाच्या रुपात मिळालं. तर द्वितीय विजेती केतकी पालव आणि तृतीय विजेत्या अमित भानुशालीला 50,000 रुपयांचे पारितोषिक मिळाले.

विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच सीमा देव आणि जल्लोष सुवर्णयुगाचे पितामह रमेश देव आणि अजिंक्य देव यांची विशेष उपस्थिती होती. कॉमेडी एक्प्रेसमधील कलाकारांनीही आपल्या कॉमेडीने सगळ्या प्रेक्षकांना पोट धरून हसण्यास भाग पाडले.

या सोहळ्यामध्ये सुधा चंद्रन यांच्या बहारदार नृत्याने सगळ्यांना थक्क केले. तसंच या कार्यक्रमाचे सुत्रसंचालक पुष्कर जोग, पूर्वी भावे यांनीही धमाकेदार परफॉर्मन्स दिले. सोबतच नेहा पेंडसे, मानसी नाईक, पियुष रानडे, मयुरी वाघ, किशोरी शहाणे या कलाकारांनीही आपल्या नृत्याने प्रेक्षकांची मनं जिंकली.

हा धम्माल महाअंतिम सोहळा येत्या 6 आणि 7 मार्चला ई टीव्ही मराठीवर प्रक्षेपित होणार आहे.