आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Poonam Pandey Arrested For \'indecent Behaviour\' In Mumbai

पूनम पांडेला अटक व सुटका, मध्यरात्री अश्लील कृत्य करताना आढळली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - तोकड्या कपड्यांमध्ये मिरा रोडमध्ये भर रस्त्यात अश्लील कृत्य करणाऱ्या अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेला पोलिसांनी 2 मेच्या रोत्री अटक करून नंतर तिला समज देऊन सोडले. गुरुवारी रात्री मिरा रोडमधील शिवार गार्डन भागात ही घटना घडली. पोलिसांनी पूनमला मुंबई पोलिस अॅक्ट 110 आणि 117 अंतर्गत कारवाई करून समज देऊन सोडून दिले.
'भारताने विश्वचषक जिंकला तर मी माझे कपडे उतरवून आनंद साजरा करेन', असे विधान करून पूनम पांडेने वादळ उठवले होते. त्यानंतर बॉलिवूडची ही हॉट बाला काही ना काही कारणाने नेहमीच चर्चेत राहिलेली आहे. आता एक पाऊल पुढे टाकत तिने भर रस्त्यातच चाळे करून अश्लीलतेचा कळस गाठला आहे.
शिवार गार्डन येथे मध्यरात्री आपली कार उभी करून भर रस्त्यात पूनम अश्लील कृत्य करताना आढळली. हा प्रकार पाहणाऱ्यांनी पोलिसांना त्याची माहिती दिली आणि तातडीने तेथे पोहोचत पोलिसांनी पूनमला अटक केली. त्यानंतर काही वेळाने पूनमला समज देऊन सोडण्यात आले.
मॉडेलिंगद्वारे आपल्या करिअरला सुरुवात करणा-या पूनमने गेल्यावर्षी 'नशा' या सिनेमाद्वारे रुपेरी पडद्यावर पाऊल ठेवले होते. पूनमच्या हॉट सीन्समुळे हा सिनेमा चर्चेत आला होता.
कोण आहे पूनम पांडे-
पूनम पांडे हे नाव मॉडेलिंगसोबतच बॉलिवूड जगतातही सर्वांच्या परिचयाचे आहे. तिला प्रसिद्धी मिळण्याचे प्रमुख कारण म्हणजे तिने निर्माण केलेले वाद. ग्लॅमर वर्ल्डमध्ये येण्यापूर्वी पूनम अनेकदा वादाच्या भोव-यात अडकली आहे. वाद आणि तिचे नाते फार जुने आहे.
सोशल साईट्सवर अॅक्टिव...
सोशल नेटवर्किंग साईट्सवर आपली उत्तेजक छायाचित्रे पोस्ट केल्यामुळे पूनम अनेकदा वादात अडकली आहे. टीम इंडियाला शुभेच्छा देण्यासाठी तिने स्वतःची बोल्ड छायाचित्रे आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केली होती.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या यापूर्वी पूनमने कोणते वाद निर्माण केले होते...