आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Poonam Pandey Arrested For \'indecent Behaviour\' In Mumbai

अटक व सुटकेनंतर बोलली पूनम, \'शॉर्ट ड्रेसवरून झाला होता पोलिसांसोबत वाद\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेचे म्हणणे आहे, की अलीकडे झालेल्या घटनेत तिला अटक करण्यात आली नव्हती. तिच्या सांगण्यानुसार, फक्त 5 मिनीटांसाठी तिचे पोलिसांसोबत वाद झाला होता. झाले असे, की माध्यमांमध्ये अशी बातमी आली होती, की मुंबईच्या मीरा रोडवर लोकांसमोर अश्लिल कृत्य करण्याच्या आरोपाखाली पूनम पांडेला अटक करून पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले होते. त्यानंतर तिला ताकिद देऊन सोडून देण्यात आले.
जेव्हा divyamarathi.comने पूनम पांडेसोबत या प्रकरणाविषयी बातचीत केली तेव्हा तिने अटकेची बातमी खोटी असल्याचे स्पष्ट सांगितले. परंतु तिने स्वीकार केले, की तिचा पोलिसांसोबत थोडा वाद झाला होता.
पूनम या प्रकरणाविषयी सांगते, 'जेव्हा मी माझ्या अटकेची बातमी ऐकली, तेव्हा मला धक्काच बसला. मी माझ्या भावासोबत बाहेर गेले होते. तिथे पोलिसांनी आम्हाला थांबवले आणि चौकशी केली. जेव्हा त्यांना समजले, मी पूनम पांडे आहे तेव्हा पोलिसांनीच माझ्यासोबत वाद घातला आणि पाच मिनीट मला त्रास दिला.'
पूनम पुढे सांगते, 'मला विश्वास बसत नव्हता, की ते माझ्या शॉर्ट ड्रेसवर वाद ‪घालत होते. मुंबईमध्ये इतर तरुणीसुध्दा असे ड्रेस परिधान करतात. मी त्यावेळी जो ड्रेस परिधान केलेला होता, तो एक मॉडर्न शॉर्ट ड्रेस होता. त्याला त्या पोलिसांनी असभ्य सांगितला होता. नंतर पोलिसांनी आम्हाला जाण्याची परवानगी दिली आणि आम्ही घरी आलो.'
'या वादानंतर जाणवले, की मला सार्वजनिक ठिकाणी माझे नाव सांगणे बंद करावे लागणार आहे. परंतु अटकेच्या बातम्यांनी मात्र मला खरचं धक्का बसला.'
पूनम सध्या घशाच्या आजाराने त्रस्त आणि तिला बोलण्यास खूप त्रासही होत आहे.
कोण आहे पूनम पांडे?
पूनमचे नाव मॉडेलिंग जगातापासून ते बॉलिवूडच्या जगापर्यंत प्रत्येक व्यक्तीला ठाऊक आहे. पूनम तिच्या सततच्या वादामुळे ओळख मिळाली आहे. ग्लॅमर जगात आल्यानंतर पूनमने अनेक वादांना उभे केले. चला एक नजर टाकूया तिच्या अशाच काही वादांवर...
सोशल साइट्सवर सतत असते सक्रिय
पूनम पांडेच्या वादांमधील सर्वाधिक वादांमध्ये तिचे टि्वटर अकाउंट आणि तिची छायाचित्रे आहेत. आपल्या टि्वटर अकाउंटवर ती असे छायाचित्रे अपलोड करते, की ते काही क्षणांत चर्चेचे विषय बनून जातात. तिने इंडियन क्रिकेट टीमला शुभेच्छा देण्यासाठी अनेकदा बोल्ड छायाचित्रे अपलोड केली आहेत.
पूनम पांडे संबंधीत वाद जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...