आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Popular TV Stars Attend The Premiere Of 'Transformers'

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'ट्रान्सफॉर्मर्स'च्या प्रीमिअरला मनीष-मिंकसह पोहोचले अनेक TV सेलेब्स, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडून - अभिनेता मनीष पॉल, अभिनेत्री मिंक बरार आणि स्मिता बन्सल
मुंबई - हॉलिवूड दिग्दर्शक मायकल बे यांच्या 'ट्रान्सफॉर्मर्स' या सिनेमाचा प्रीमिअर अलीकडेच मुंबईत आयोजित करण्यात आला होता. या प्रीमिअरला छोट्या पडद्यावरील कलाकारांनी आपला सहभाग नोंदवला. हा सिनेमा 25 जून रोजी इंडोनेशिया आणि फिलिपिन्समध्ये तर 27 जून रोजी
यूएससह भारतात रिलीज झाला.
यावेळी प्रीमिअरला टीव्ही सेलेब्सनी हजेरी लावली होती. करण जोहरच्या 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' या सिनेमाद्वारे बॉलिवूड करिअर सुरु करणारा सिद्धार्थ शुक्ला या प्रीमिअरमध्ये सहभागी झाला होता. यासह जेलियन मेंडोंसा, पूरव कोहली, गौतम रोडे, लॉरेन गोटलिब, मनीष पॉल, मिंक बरार, नंदीश संधू, पूजा गौर, रणविजय सिंह, रघु राम, सचिन खेडेकर, स्मिता बन्सल, विशाल मल्होत्रा, व्हिजे अँडीसह बरेच सेलेब्स प्रीमिअरला हजर होते. यावेळी राघव सच्चर पत्नी अमिता पाठकसह आणि जय सोनी पत्नी पूजा शाहसह येथे पोहोचले. शमा सिकंदर बॉयफ्रेंड एलेक्ससह येथे आली होती.
कोरिओग्राफर आणि डान्सर सलमान खाननेही प्रीमिअरला हजेरी लावून सिनेमाची मजा लूटली. यावेळी सर्व कलाकार कूल लूकमध्ये दिसले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'टान्सफॉर्मर्स'च्या प्रीमिअरला पोहोचलेल्या TV सेलेब्सची छायाचित्रे...