आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन महिन्यांपूर्वी मृत सांगण्यात आलेली ही व्यक्ती आहे जिवंत, बॉलिवूड स्टार्सनी दिली होती श्रद्धांजली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो: शाहरुख खान आणि राजू करिया)
मुंबईः दोन महिन्यांपूर्वी म्हणजे 17 ऑगस्टला चित्रपटसृष्टीतील वरिष्ठ पीआरओ राजू करिया यांच्या निधनाची बातमी मीडियात आली होती. हृदयरोगाच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाल्याची ही बातमी होती. मात्र ही व्यक्ती मृत नसून जीवित असल्याचे उघड झाले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजू करिया यांनी पूर्वनियोजित कट रचून स्वतःच्या मृत्यूची बातमी पसरवली होती. राजू करिया यांच्या निधनाचे वृत्त कळल्यानंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला होता.
Dainikbhaskar.comशी बातचित करताना राजू यांनी मात्र आपल्या निधनाचे वृत्त कसे पसरले याविषयी दुसरीच कहाणी सांगितली आहे. त्यांनी सांगितले, की ही खूप हास्यास्पद घटना आहे. ते म्हणाले, मी ब्रेन सर्जरीसाठी अमरावती येथील एका रुग्णायलात दाखल होतो. 9 ऑगस्टपासून या रुग्णालयात उपचार सुरु होते. मृत्यूच्या बातमीविषयी त्यांना विचारले असता, ते म्हणाले, मला डॉक्टरांनी फोन बंद ठेऊन आराम करण्याचा सल्ला दिला होता. त्याकाळात रुग्णालयातील एका रुग्णाच्या नातेवाईकाने माझा फोन चोरी केला. याकाळात त्यांना फोन केला असता, एका महिलेने त्यांचे निधन झाल्याचे सांगितले आणि अशा प्रकारे ही बातमी मीडियात पसरली.
आश्चर्याची बाब म्हणजे, त्यांच्या पत्नीच्या नावाने मीडियात वक्तव्य प्रकाशित झाले होते. जेव्हा करिया यांना याविषयी विचारले असता, ते म्हणाले, की ती महिला त्यांची पत्नी नव्हती. तर त्या महिलेने मात्र स्वतःला करियांची पत्नी सांगितले होते. ही झाली राजू करिया यांनी सांगितलेली कहाणी. मात्र इंडस्ट्रीशी निगडीत सूत्र काही वेगळेच सांगत आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आर्थिक तंगीमुळे राजू करिया यांनी स्वतः हा कट रचला होता. त्यांच्या निधनावर बॉलिवूड इंडस्ट्रीतून कशा प्रतिक्रिया उमटतात, हे राजू करिया यांनी जाणून घ्यायचे होते. एकेकाळी राजू करिया इंडस्ट्रीत पीआर किंग म्हणून ओळखले जात होते. बॉलिवूडमधील अनेक बडे स्टार्स त्यांचे क्लायंट होते. त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रिया त्यांना जाणून घ्यायच्या होत्या. दिग्दर्शक संजय गुप्ता, रोनित रॉय आणि बिग बॉस फेम एजाज खान यांनी राजू करियांच्या निधनावर शोक व्यक्त केला होता.
याविषयी जेव्हा रोनित रॉयशी आम्ही बातचित केली तेव्हा त्यांनी हा स्टंट संतापजनक असून त्यावर काही बोलण्यास नकार दिला. या विषयावर आपले म्हणणे मांडण्यासाठी राजू करिया आज पत्रकार परिषद घेणार आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, हा स्टंट करिया यांच्यासाठी फायदेशीर ठरला आहे. त्यांनी सांगितले, की मी पीआर म्हणून सहा ते सात नवीन सिनेमे साइन केले आहेत.