आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prachi Desai : From TV\'s Bahu Till Bollywood Item Girl

TV \'बहू\'पासून ते बॉलिवूडच्या आयटम गर्लपर्यंत, पाहा किती बदलली प्राची देसाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: 2006मध्ये एक साधी-सरळ सून बनून टीव्ही इंडस्ट्रीमध्ये एंट्री करणारी प्राची देसाई आता बॉलिवूडची आयटम गर्ल बनली आहे. तिने एकता कपूरच्या प्रॉडक्शन हाऊस बालाजी मोशन पिक्चर्स अंतर्गत आणि मोहित सूरी दिग्दर्शित 'एक व्हिलेन' सिनेमात एक आयटम नंबर केला आहे. या आयटम नंबरचा ऑडियो-व्हिडोओ मागील काही दिवसांपूर्वी रिलीज झाला.
'आवारगी...' बोल असलेल्या या गाण्यात प्राची काळ्या रंगाच्या आटफिटमध्ये दिसत असून सर्वांना भूरळ घालण्याचा प्रयत्न करत आहे. या सिनेमात सिध्दार्थ मल्होत्रा, श्रध्दा कपूर आणि रितेश देशमुख यांच्या मुख्य भूमिका आहेत.
एकताच्या मालिकेमधून केली करिअरला सुरूवात
प्राची देसाईने आपल्या अभिनयाची सुरूवात एकता कपूरच्या 'कसम से' या मालिकेतून केली. या मालिकेत तिचा को-स्टार राम कपूर होता. 2006पासून 2009पर्यंत झी टीव्हीवर प्रसारित होणा-या या शोमध्ये प्राचीने बानी नावाचे पात्र साकारले होते. सांगितले जाते, की प्राचीला भूमिकेत झोकून देण्यासाठी एकताने तिला सर्व अभिनयाच्या टिप्स दिल्या होत्या. 2008मध्ये तिने 'रॉक ऑन'च्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये एंट्री करून एकताची मालिका सोडली होती. 2006मध्येच ती 'कसौटी जिंदगी की' या लोकप्रिय मालकेतही दिसली होती.
या सिनेमांमध्ये झळकली आहे
2008मध्ये प्राचीने मोठ्या पडद्यावर पहिले पाऊल ठेवले. अभिषेक कपूरच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या 'रॉक ऑन'मधून तिने मोठ्या पडद्यावर ओळख मिळवली. फरहान अख्तरने हा सिनेमा निर्मित करून मुख्य भूमिकाही साकारली होती. त्यानंतर 'लाइफ पार्टनर' (2009) 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई' (2010), 'तेरी मेरी कहानी' (2012), 'बोल बच्चन' (2012), 'आय, मी और मै' (2013) आणि 'पुलिसगिरी' (2013)या सिनेमांमध्ये काम करून ती चांगलीच प्रसिध्दीस आली.
पर्सनल डिटेल:
जन्म : 22 सप्टेंबर 1988
ठिकाण: सूरत, गुजरात
काम: अभिनय आणि मॉडेलिंग
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा प्राचीच्या पर्सनल लाइफची काही छायाचित्रे...