आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेघनाने दिली आदित्यकडे प्रेमाची कबूली, पाहा सोज्वळ मेघनाचा ग्लॅमरस लूक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

झी मराठी वाहिनीवरील 'जुळून येती रेशीमगाठी' या गाजत असलेल्या मालिकेला आता नवीन वळण आले आहे. मेघना आदित्यचा स्वीकार करणार की आपल्या प्रियकराकडे परत जाणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. हीच उत्सुकता आदित्यलासुद्धा लागली होती. अखेर आदित्य ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहात होता, तो दिवस आला. मेघनाने आपला निर्णय आदित्यला सांगितला. मेघनाने आदित्यकडे आपल्या प्रेमाची कबूली दिली आहे. त्यामुळे आता मालिकेला रंजक वळण प्राप्त झाले आहे. लवकरच आदित्य मेघनाला घेऊन जेजुरीला जाणार आहे. मेघना-आदित्यची ही लव्हस्टोरी प्रेक्षकांना खिळवून ठेवणार, हे नक्की.
या मालिकेत समंजस मेघनाची भूमिका साकारत आहे अभिनेत्री प्राजक्ता माळी. मुळची पुण्याची असलेली प्राजक्ता भरतनाट्यममध्ये विशारद आहे. छोट्या पडद्यासोबतच मोठ्या पडद्यावरसुद्धा प्राजक्ता झळकली आहे. 'खोखो' या सिनेमात ती भरत जाधवसोबत झळकली होती. शिवाय 'संघर्ष' या आगामी सिनेमात ती झळकणार आहे. छोट्या पडद्यावर 'सुवासिनी', 'बंध रेशमाचे', 'फिरुनी नवीन जन्मेन मी' या मालिकांमध्ये तिने काम केले आहे. 'जुळून येती रेशीमगाठी' ही प्राजक्ताची मालिका सध्या झी मराठी वाहिनीवर सुरु आहे. या मालिकेत प्राजक्ता साध्या लूकमध्ये झळकत आहे.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला प्रेक्षकांच्या लाडक्या मेघनाचा ग्लॅमरस लूक छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा मालिकेत अगदी सिंपल लूकमध्ये दिसणारी प्राजक्ता ग्लॅमरस लूकमध्ये कशी दिसते.
फोटो साभार : फेसबुक