आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या अभिनेता प्रकाश राज कसे पोहोचले फिल्म इंडस्ट्रीत?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
म्हणतात, की फिल्म इंडस्ट्रीत फक्त दोन गोष्टींची गरज असते. पहिली म्हणजे टॅलेंट आणि दुसरी पैसा. जर तुमच्याजवळ क्षमता असेल तर चांगली संधी मिळताच तुम्ही रात्रीतून स्टार बनू शकता. असेच काही घडले दाक्षिणात्य स्टार आणि बॉलिवूडमध्ये खलनायक म्हणून नावारुपास आलेले प्रकाश राज यांच्यासोबत.
26 मार्च 1965मध्ये कर्नाटकच्या पुट्टूरमध्ये जन्मलेले प्रकाश यांचे दक्षिण भारतीय सिनेमात खूप नाव आहे. त्यांना मणिरत्नम यांच्या दिग्दर्शना अंतर्गत बनलेल्या सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. ते अभिनेते, निर्माता, दिग्दर्शक आणि सिनेमा वितरकसुध्दा आहेत. त्यांचे म्हणणे आहे, की त्यांच्या आयुष्यात सिनेमांचे केवळ 5 टक्के महत्व आहे. याव्यतिरिक्त त्यांच्याजवळ अनेक काम आहेत आणि ते त्यात सतत व्यस्त असतात. त्याचे कुटुंब त्यांना खूप महत्वपूर्ण वाटते.
प्रकाश आपल्या यशाचे श्रेय आपल्या कामाप्रति केलेल्या समर्पणाला देतात. ते म्हणतात, की कोणत्याही कामाला मोठे किंवा छोटे मानत नाही. प्रत्येक काम मन लावून करतो. बॉलिवूडमध्ये नाव कमवण्याच्या बाबतीत ते म्हणतात, की आता लोक त्यांना मुंबईमध्येसुध्दा ओळखायला लागले आहेत. हे बघून असे वाटते, की लोक मला पसंत करायला लागले आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या बॉलिवूडमध्ये कोणत्या सिनेमातून मिळाली प्रकाश यांना प्रसिध्दी?
१) 'वॉन्टेड' सिनेमामधून मिळाली ओळख
बॉलिवूडमध्ये प्रकाश यांनी दमदार एंट्री 2009मध्ये आलेल्या प्रभुदेवाच्या दिग्दर्शनाअंतर्गत आलेल्या आणि सलमान खान अभिनीत 'वॉन्टेड' सिनेमामधून केली. अ‍ॅक्शनने भरलेल्या या सिनेमात प्रकाश यांनी खलनायकाच्या रुपात दमदार एंट्री केली. यापूर्वी प्रकाश बॉलिवूडमध्ये 'शक्ती' आणि 'खाकी'सारख्या सिनेमांमध्ये दिसले होते. परंतु इथे त्यांच्या पदरी यश 'वॉन्टेड' सिनेमाच्या गनी भाईच्या भूमिकेतून पडले.
'वॉन्टेड'नंतर त्यांनी अनीस बज्मी यांच्या 'रेडी' सिनेमातसुध्दा काम केले. त्यानंतर रोहित शेट्टी दिग्दर्शिक 'सिंघम' सिनेमात त्यांनी पुन्हा एकदा खलनायकाची भूमिका साकारली. या सिनेमातील त्यांचे 'जयकांत शिक्रे' हे पात्र बरेच प्रसिध्द झाले होते. तेव्हापासून ते बॉलिवूडमध्ये एका खलनायकाच्या रुपाने ओळखले जाऊ लागले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि वाचा प्रकाश यांनी शाहरुख आणि आमिर यांचा पराभव करून कोणता किताब जिंकला होता?