आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prasad Oak Marathi Drama Nandi Completed 50th Show

प्रसाद ओकच्या 'नांदी'चे यशस्वी 50 प्रयोग, कलाकारांनी साजरा केला आनंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हृषिकेश जोशी लिखित आणि दिग्दर्शित 'नांदी' या नाटकाचा यशस्वी 50वा प्रयोग शुक्रवारी मुंबईत पार पडला. यानिमित्ताने नाटकातील सर्व कलाकारांनी एकत्र येऊन हा आनंद साजरा केला.
दिलीप जाधव, प्रसाद कांबळी, चंदू लोकरे आणि संज्योत वैद्य या चार निर्मात्यांनी एकत्र येऊन हे नाटक रंगभूमीवर आणलं आहे. 'नांदी'मध्ये दहा नाटकांतील स्त्री-पुरुष संबंधांचं चित्रण असलेले प्रवेश निवडण्यात आले आहेत. त्यातून या नात्यात कोणती स्थित्यंतरं झाली, हे दाखविण्याचा प्रयत्न केला गेला आहे. 'अभिज्ञान शाकुंतलम्'पासून ते 'चाहुल'पर्यंत अनेक नाटकांचा समावेश या नाटकात करण्यात आला आहे.
शरद पोंक्षे, अविनाश नारकर, प्रसाद ओक, चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, हृषिकेश जोशी, अश्विनी एकबोटे, सीमा देशमुख, तेजस्विनी पंडित आणि स्पृहा जोशी असे दहा कलाकार काम करत आहेत. या दहा कलाकारांनी नाटकांत एकूण 23 भूमिका पार पाडल्या आहेत.
प्रसाद ओकचा स्त्री भूमिकेतील अभिनय आणि अजय पुरकर यांचं गायन नाटकात वरचढ ठरतं. प्रदीप मुळ्ये यांनी नाटकाचे नेपथ्य आणि प्रकाशयोजना केली असून राहुल रानडे यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे.