मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री आणि देशमुख घराण्याची लाडकी सून जेनेलिया प्रेग्नेंट असल्याची बातमी मीडियात आली आहे. या बातमीमुळे देशमुख कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. बाबा होणारा रितेश आपल्या पहिल्या बाळाविषयी खूप उत्साहित आहे. या बातमीनंतर जेनेलिया पहिल्यांदा रविवारी मीडियासमोर आली. निमित्त होते रितेश देशमुखच्या पहिल्या मराठी सिनेमाच्या लाँचिंगचे. आगामी 'लई भारी' या मराठी सिनेमाद्वारे रितेश पहिल्यांदा मराठी सिनेमात झळकणार आहे.
या इवेंटमध्ये जेनेलिया खूप आनंदी दिसली. व्हाइट गोल्डन अनारकली सूटमध्ये जेनेलिया पूर्वीपेक्षा लठ्ठ दिसली. 2012मध्ये रितेश आणि जेनेलियाचे लग्न झाले.
रितेशची प्रमुख भूमिका असलेला 'लई भारी' हा सिनेमा निशिकांत कामत यांनी दिग्दर्शित केला आहे. या लाँचिंग इवेंटला मनसे अध्यक्ष राज ठाकरे, अभिनेते महेश मांजरेकर यांच्यासह मराठी फिल्म इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज मंडळींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा 'लई भारी' या सिनेमाच्या लाँचिंग इवेंटमध्ये सहभागी झालेल्या स्टार्सची खास झलक...