मुंबई: अभिनेत्री प्रिती झिंटा अमेरिकेहून परतली आहे. रविवारी (22 जून) दुपारी तिला मुंबई एअरपोर्टवर बघितल्या गेले. परंतु बातमी आहे, की अद्याप पोलिसांनी तिचा जबाब नोंदवलेला नाहीये. नेस वाडियाच्या विरोधात छेडछाडीची तक्रार दाखल केल्यानंतर प्रिती अमेरिकेला निघून गेल्यामुळे पोलिस तिचा जबाब नोंदवू शकले नाहीत.
पोलिसांनी तिला जबाब नोदवण्यासाठी अमेरिकेहून बोलावले आहे. रविवारी दुपारी ती अमेरिकेहून लंडन ते मुंबई अशा मार्गे परतली. ती ब्रिटीश एअरवेजने मुंबईला पोहोचली. सुत्रांच्या सांगण्याप्रमाणे, सोमवारी किंवा मंगळवारीपर्यंत पोलिस प्रितीचा जबाब नोंदवू शकता.
पोलिस प्रितीची साक्ष कुठे घेणार याबाबच अद्याप काहीच खुलासा झालेला नाहीये. मात्र साक्ष देण्यासाठी तिला पोलिस स्टेशनला बोलवले जाणार नाहीये. कारण कायदेशीररित्या महिलांना जबाब नोंदवण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये बोलवले जात नाही. अशा प्रकरणात पोलिसांना महिलेच्या घरी जाऊन जबाब नोंदवावा लागतो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा अमेरिकेहून परतलेल्या प्रिती झिंटाची मुंबई एअरपोर्टवर क्लिक केलेली छायाचित्रे...