आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नेसच्या विरोधात नवीन साक्षीदारांची यादी घेऊन प्रिती पोहोचली पोलिस कमिशनरकडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - पोलिस कमिशनर ऑफिसमधून बाहेर पडताना प्रिती झिंटा)
मुंबई- सिने-अभिनेत्री प्रिती झिंटाने मुंबईचे पोलिस कमिशनर राकेश मारिया यांची भेट भेटली. तिचा दावा आणखी मजबूत करण्यासाठी, तिने साक्षीदारांच्या नावांची नवीन यादी त्यांच्याकडे सोपवली. प्रितीने 12 जून रोजी मुंबईच्या मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात आपला एक्स-बॉयफ्रेंड नेस वाडीया याच्याविरूद्ध तक्रार दाखल केली होती. सोमवारी 39 वर्षीय प्रितीने मारियांची भेट घेतली आणि 30 मे रोजी वानखेडे स्टेडियमवर घडलेल्या घटनेची माहिती दिली.
मारिया यांनी सांगितले, "प्रितीने आमच्याकडून विदेशात जाण्याची परवानगी मागितली होती. आता त्यांना आम्ही परवानगी दिली आहे. याआधी त्यांनी घटनेबद्दल अतिरिक्त माहिती दिली. अजून साक्षीदारांची नावेदेखील दिली आहेत."
नेस वाडियाला चौकशीसाठी कधी बोलावणार असा प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, "याआधी आम्ही सगळ्या साक्षीदारांचा जबाब नोंदवून घेऊ आणि मग वाडियाला चौकशीसाठी कधी बोलवायचे हे ठरवू."
पोलिस सुत्रांच्या मते, नवीन साक्षीदारांच्या यादीत प्रितीने सहा विदेशी लोकांची नावे दिली आहेत, जी घटनेच्या वेळी वानखेडे स्टेडियमवर उपस्थित होती.