आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साक्षीदाराचा जबाब : नेस वाडियाने मुरगळला होता प्रितीचा हात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेत्री प्रिती झिंटाने लावलेल्या छेडछाडीच्या आरोप प्रकरणी नेस वाडियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणी पोलिसांनी नोंदवलेल्या साक्षीनुसार एका साक्षीदाराने त्याच्यासमोर प्रितीला वाईट वागणूक मिळाल्याचा जबाब नोंदवला आहे.

पोलिसांनी गुरुवारी या प्रकरणी तिघांची साक्ष नोंदवली होती. या प्रकरणाचा तपास करणा-या मरीन ड्राइव्ह पोलिसांनी साक्षीसाठी व्यावसायीक जय कनौजिया यांना बोलावले होते. जय हे या घटनेच्या वेळी प्रीतीच्या बाजुला बसलेले होते. वाडियांनी प्रितीचा हात मुरगळल्याचे आपण पाहिले होते, असे जय यांनी आपल्या जबाबात सांगितले आहे. दरम्यान, गोंधळामुळे दोघांमध्ये काय चर्चा झाली, हे मात्र ऐकू आले नसल्याचे जय यांनी सांगितले आहे.

याबरोबरच पोलिसांनी पारुल खन्ना आणि पत्रकार शैलेश गुप्ता यांचेही जबाब नोंदवले. मात्र, त्यांनी पोलिसांना काय सांगितले याबाबत अद्याप खुलासा झालेला नाही. पोलिस या प्रकरणी घटनास्थळी उपस्थित असणा-या आणखी काही जणांची चौकशी करणार असून, त्यात तारा नावाच्या एका महिलेचाही समावेश आहे. तारा पोलिसांना या प्रकरणी भांडणाचे खरे कारण सांगू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.