आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रिती-नेस प्रकरणात चौथा साक्षीदार म्हणाला,\'दोघांत सर्वकाही ठिक होते\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो: प्रिती झिंटा आणि नेस वाडिया)
मुंबई: अभिनेत्री प्रिती झिंटासोबत गैरवर्तणूक केल्याप्रकरणी आरोपांचा सामना करणा-या नेस वाडियाने आपल्या बचावासाठी चौथ्या साक्षीदाराचा आधार घेतला आहे. या साक्षीदाराने मुंबई पोलिसांना सांगितले, की 30 मे रोजी वानखेडे स्टेडिअमवर क्रिकेट सामन्यादरम्यान दोघांमध्ये सर्वकाही ठिक होते.
वाडियाचा चौथा साक्षीदार निमिश महिंतुराने सांगितले, की त्या रात्री दोघे सामान्य आणि आपल्या टीमला चिअरअप करताना दिसले. महिंतुरा त्या रात्री स्टेडिअममध्ये प्रिती आणि नेसच्या मागच्या रांगेत बसलेले होते. महिंतुराने त्या घटनेचा उल्लेख करताना सांगितले, की दोघांमध्ये कोणतीही धक्काबुक्की झालेली नसून सामान्य वाद झाला होता.
वास्तवात दोघे नॉर्मल दिसून आले आणि आपल्या टीमचे मनोबल वाढवण्यासाठी चिअरअप करताना दिसले. महिंतुर यांनी पुढे सांगितले, की नेस वाडियाने प्रितीजवळ येऊन एक मिनीट थांबून बातचीत केली. त्यानंतर मी नेस वाडियाला स्टेडिअमच्या आवारातून जाताना पाहिले. तिथे मी एअर-कंडिशन बॉक्सजवळ बसलेलो होतो. मी त्यांच्या जास्त जवळ नव्हतो. म्हणून दोघांतील बातचीत मला ऐकू आली नाही आणि स्टेडिअममध्ये खूप गोंधळही चालू होता.
प्रितीने 12 जून रोजी वाडियावर सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तणूक आणि अभद्र भाषेचा वापर केल्याचा आरोप लावून तक्रार दाखल केली होती. मात्र, नेस वाडियाने हे आरोप खोटे आणि अर्थहीन आहेत असे सांगून नाकारले होते.