आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Preity Zinta Ness Wadia News In Marathi, Divya Marathi

प्रीती झिंटाने नेस वाडियाविरोधात घाणेरडे शब्द वापरले - साक्षीदार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेत्री प्रीती झिंटा हिने पूर्व प्रियकर व उद्योगपती नेस वाडियाविरोधात 30 मे रोजी वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यावेळी घाणेरडे शब्द वापरले, असा जबाब वाडियाने दिलेल्या साक्षीदाराने पोलिसांना दिला आहे. सायन दारू असे साक्षीदाराचे नाव आहे.
प्रीती झिंटाने नेस वाडियाविरोधात विनयभंगाची तक्रार नोंदवली आहे. त्यानंतर वाडिया याने त्याच्याकडून काही साक्षीदारांची नावे पोलिसांकडे दिली आहेत. त्यानुसार पोलिस साक्षीदारांचे जबाब नोंदवत आहेत. 30 मे रोजी प्रीती आणि वाडिया यांच्यात वानखेडे स्टेडियममध्ये वाद झाला होता.