आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Preity Zinta Not Aware Of Who Don Ravi Pujari Is ?

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रिती म्हणाली, कोण रवी पुजारी? रवि शास्त्री आणि चेतेश्वर पुजारा माझ्या परिचयाचे!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रिती झिंटा
मुंबई: प्रिती झिंटा आणि नेस वाडिया प्रकरणात रवि पुजारी समोर आल्यानंतर पोलिस या प्रकरणाची चौहूबाजूंनी तपासणी करत आहे. या प्रकरणात जबाब नोंदवण्यासाठी मुंबईमध्ये पोहोचलेल्या प्रितीने अंडरवर्ल्ड डॉन रवि पुजारीला ओळखण्यास नकार देऊन या प्रकरणाला नवीन वळण दिले आहे. प्रितीच्या लीगल टीमच्या वतीने मुंबई पोलिसांना दिलेल्या एका पत्रामध्ये सांगण्यात आले आहे, की प्रिती झिंटा अंडरवर्ल्ड डॉन रवि पुजारीला ओळखत नाही.
सुत्रांच्या सांगण्यानुसार, प्रितीव्दारा मुंबई गुन्हेशाखेच्या अँटी एक्सटॉर्शन सेलला दिलेल्या पत्रात सांगितले, की ती अडरवर्ल्ड डॉन रवि पुजारीला ओळखत नाही. मात्र ती रवि पुजारीच्या नावाशी मिळते-जुळते नाव माजी क्रिकेटपटू रवि शास्त्री आणि चेतेश्वर पुजाराला वैयक्तिरित्या ओळखते. प्रितीच्या लीगल टीमने तपासणीसाठी सहकार्य करणार असल्याचा विश्वास पोलिसांना दिला आहे.
अशीही बातमी येत आहे, की वाडिया ग्रुपला आलेल्या फोन कॉल्सविषयीसुध्दा पोलिस प्रितीची चौकशी करू शकतात. अंडरवर्ल्ड डॉन रवि पुजारीने नेस वाडियाचे उद्योगपती वडील नुस्ली वाडिया यांच्या सेक्रेटरीला फोन करून प्रिती-नेस वादापासून दूर राहण्याची धमकी दिली होती. एवढेच नाही तर, रवि पुजारीने यापूर्वी प्रितीचा चाहता असल्याचेही सांगितले होते.
हे आहे प्रकरण...
प्रिती झिंटाने 12 जून रोजी एक्स बॉयफ्रेंड नेस वाडियाच्या विरोधात 30 मे रोजी झालेल्या आयपीएल सामन्यादरम्यान छेडछाड केल्याचा आरोप लावून तक्रार दाखल केली होती. प्रितीच्या लिखित तक्रारीवरून मरीन ड्राइव्ह पोलिसांनी नेसच्या विरोधात भारतीय दंड कलम 354, 504, 506, आणि 509 अंतर्गत पाऊल उचलेले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि वाचा फोनवर नुस्ली वाडियाच्या सेक्रेटरीशी रवि पुजारीने काय बातचीत केली...?