आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : 'तप्तपदी'च्या प्रीमिअरला जमली मराठी सेलेब्सची मांदियाळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सचिन नागरगोजे दिग्दर्शित 'तप्तपदी' हा मराठी सिनेमा आज सिनेरसिकांच्या भेटीला आला. रिलीजपूर्वी गुरुवारी मुंबईत या सिनेमाचा प्रीमिअर सोहळा आयोजित करण्यात आला होता. जुहू येथील पीव्हीआरमध्ये या सिनेमाचा प्रीमिअर ठेवण्यात आला होता. सिनेमातील कलाकारांसह म्हणजेच अभिनेता कश्यप परुळेकर, वीणा जामकर श्रुती मराठे, शरद पोंक्षे यांच्यासह प्रीमिअरला मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. सुबोध भावे, जयवंत वाडकर, कादंबरी कदम, गौरव घाटनेकर मिलिंद शिंत्रे, सुयश टिळक, अश्विनी एकबोटे, योगिनी चौक यांच्यासह ब-याच सेलिब्रिटींनी प्रीमिअरला हजेरी लावली होती.
'तप्तपदी'विषयी...
'तप्तपदी' या सिनेमाचे कथानक गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी रचलेल्या 'दृष्टिदान' या लघुकथेवर आधारित आहे. ही लघुकथा मानवी जीवनातील प्रेम, समर्पण आणि त्यागाचे प्रकर्षाने दर्शन घडवते. या कथेपासून प्रेरित होऊन दिग्दर्शक सचिन बळीराम नागरगोजे आपल्यापर्यंत माधव, मीरा आणि सुनंदाची कथा 'तप्तपदी' घेवून येत आहेत.
1930-40 च्या दशकामध्ये समाजात वाहणाऱ्या नवा विचारांचा आणि त्यातून घडणाऱ्या सामाजिक बदलांचा बारकाईने अभ्यास करुन दिग्दर्शक सचिन नागरगोजे हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणत आहेत.
कश्यप परुळेकर, वीणा जामकर श्रुती मराठे आणि नीना कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'तप्तपदी' मध्ये शरद पोंक्षे, अंबरीश देशपांडे आणि अश्विनी एकबोटे अशा ताकदीच्या कलाकारांचाही सहभाग आहे. रोहीत नागभिडे यांनी या सिनेमाला संगीत दिले आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा प्रीमिअर सोहळ्याला जमलेल्या सेलेब्सची खास छायाचित्रे...