आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pricey Prachi Desai Opts Out From The Small Budget Film

प्राची देसाईने सोडला \'गुड्डू की गन\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुणाल खेमूची प्रमुख भूमिका असलेल्या 'गुड्डू की गन' चित्रपटाचे दिग्दर्शन शंतनू रॉय आणि शीर्षक आनंद करत आहेत. त्यांनी यापूर्वी '3 जी' हा चित्रपट बनवला होता. या चित्रपटाबाबत आशादायक बाब ही होती की, लवकरच अभिनेता-अभिनेत्रीचे नाव निश्चित करण्यात आले.
कुणालसोबत अभिनेत्री म्हणून काम करण्यास प्राची देसाईने होकार दिला होता. त्यामुळे प्री-प्रॉडक्शनसंबंधित तयारीदेखील झाली. मात्र, प्राचीने या चित्रपटातून काढता पाय घेतल्याने मोठी अडचण झाली आहे. प्राचीने चित्रपट सोडण्यामागचे नेमके कारण मात्र सांगितले नाही. त्यामुळे सध्या तिच्या जागी अन्य अभिनेत्रींचा शोध घेणे चालू आहे. चित्रपटाचे शुटिंग कोलकातामध्ये होणार आहे.