आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नींच्या भूमिकेत प्रियांका, दीपिका, अनुष्का

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कधी कॉलेजमधील तरुणी तर कधी प्रेमात वेडी झालेली मुलगी बनणार्‍या या आघाडीच्या नट्या यावर्षी पत्नींच्या भूमिकेत दिसणार आहेत. सिनेमा व्यवसायातील तज्ज्ञांच्या मते, आपल्या भूमिकेमध्ये थोडासा बदल आणण्यासाठी अशा भूमिकांची निवड या नट्या करत आहेत.
प्रियांका चोप्रा झोया अख्तरच्या ‘दिल धडकने दो’मध्ये राहुल बोसच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. राहुलने यापूर्वी मल्लिका शेरावतसोबत रोमान्स करून प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले आहे. आता या दोघांची जोडी प्रेक्षकांसाठी एक नवा अनुभव असेल. दीपिका पदुकोणदेखील दिग्दर्शक होमी अदजानियाच्या ‘फाइंडिंग फॅनी’मध्ये रणवीर सिंहच्या पत्नीच्या भूमिकेत आहे.
खर्‍या आयुष्यात या दोघांनी हे नाते स्वीकारले नसले तरी पडद्यावर मात्र त्यांना पती-पत्नी म्हणून पाहता येणार आहे. या यादीत अनुष्का शर्माचा तिसरा क्रमांक आहे. ती आपल्या बॅनरच्या ‘एनएच 10’ या पहिल्या सिनेमात नील भूपलमची पत्नी बनली आहे. यापूर्वी ‘रब ने बना दी जोडी’मध्ये ती शाहरुखची पत्नी बनली होती.