आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Priyanka Anushka Bonding On The Set Of 'Dil Dhakne Do'

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'दिल धडकने दो'च्या सेटवर प्रियांका-अनुष्काची बॉडिंग, पाहा छायाचित्रे...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फरहान अख्तर(लाल टी-शर्टमध्ये), दिव्या सेठ (पांढ-या आणि गुलाबी ऑउटफिटमध्ये), प्रियांका चोप्रा (पांढ-या टी-शर्टमध्ये), अनुष्का शर्मा (काळ्या कुर्त्यामध्ये) आणि 'दिल धडकने दो'चे क्रू मेंबर्स
मुंबई: बी-टाऊनमध्ये कधी काय घडू शकते याचा अंदाजा लावणेदेखील कठिण आहे. सध्या बॉलिवूडमध्ये प्रियांका चोप्रा आणि अनुष्का शर्मा यांच्यामध्ये चांगली बॉडिंग दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी अशा बातम्या आल्या होत्या, की दोघींमध्ये काही कारणास्तव मतभेद निर्माण झाले होते. अलीकडेच, 'दिल धडकने दो'च्या शुटिंगदरम्यान दोघींना एकत्र बघून वाटत नव्हते, की त्यांच्यामध्ये काही मतभेद आहेत.
सुत्रांच्या सांगण्यानुसार, बर्सिलोनामध्ये अनुष्का आणि प्रियांका एकमेकींसोबत चांगला वेळ घालवत आहे. दोघी जास्तीत जास्त वेळ एकमेकींसोबत राहण्याचा प्रयत्न करतात. एवढेच नाही तर, प्रियांकाने टि्वटरवर 'दिल धडकने दो'च्या टीमचा एक ग्रुप फोटो पोस्ट केला आणि लिहिले, 'बेस्ट क्रू एव्हर'
या फोटोमध्ये तिने फरहान अख्तर आणि रितेश सिधवानीव्यतिरिक्त अनुष्का शर्मालासुध्दा मेन्शन केले आहे. सेटवरून येणा-या गॉसिपने सिनेमाची इतकी प्रसिध्दी होत आहे, की जोया अख्तरला प्रमोशन कदाचित गरज पडणार नाहीये.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा 'दिल धडकने दो'च्या स्टार्सने अलीकडेच टि्वटरवर पोस्ट केलेली छायाचित्रे...