आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Priyanka At “Mary Kom” Exclusive Footage Screening For Media

PICS: भन्साळी-प्रियांकाने ठेवले Exclusive Footage Screening

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(संजय लीला भन्साली आणि प्रियांका चोप्रा)
मुंबई - अभिनेत्री प्रियांका चोप्राने मंगळवारी आपल्या आगामी 'मेरी कोम' या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित केले होते. यावेळी सिनेमाचे एक्सक्लूझिव्ह फुटेज दाखवण्यात आले. स्क्रिनिंगचे आयोजन मुबंईतील व्हिला 69 मध्ये करण्यात आले होते.
स्क्रिनिंगवेळी प्रियांका ब्लू मिनी ड्रेसमध्ये दिसली. तिने गळ्यात फॅशनेबल नेकलेस आणि पायात उंच हिलची सँडल घातली होती. यावेळी तिच्यासह निर्माते संजय लीला भन्साळी आणि अभिनेता दर्शन कुमार दिसले. दिग्दर्शक उमंग कुमार पत्नी वनितासह स्क्रिनिंगमध्ये सहभागी झाले होते.
प्रियांकाचा 'मेरी कोम' हा सिनेमा बॉक्सर मेरी कोमच्या आयुष्यावर आधारित आहे. उमंग कुमार दिग्दर्शित हा सिनेमा संजय लीला भन्साळी यांची निर्मिती आहे. येत्या 5 सप्टेंबरला सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा इव्हेंटवेळी क्लिक झालेली सेलेब्सची छायाचित्रे...