आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Priyanka Chopra And Katrina Kaif To Clash At The Box Office

प्रियांकाचा कतरिना कैफशी संघर्ष अटळ...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कतरिनाचा 'बँग बँग' चित्रपट 2 आक्टोंबरपर्यंत तयार होणार नाही, असा विचार करून प्रियांका अभिनीत 'मेरी कोम'चे निर्माता या दिवशी आपला चित्रपट प्रदर्शित करत आहेत. तरीही या दोघींमधील संघर्ष अटळ आहे. कारण कतरिनाचा 'फँटम' हा दुसरा चित्रपट या दिवशीच प्रदर्शित होणार आहे.
फॉक्स स्टार इंडियाचे बहुतांशी सूत्र अजूनही सिद्धार्थ आनंदच्या दिग्दर्शनामध्ये बनत असलेल्या हृतिक रोशन आणि कतरिना कैफ अभिनीत 'बॅँग बॅँग' हा अँक्शन चित्रपट 2 ऑक्टोबरलाच प्रदर्शित होणार असल्याचे सांगतात. मात्र, सूत्रांनुसार या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होणे अशक्य आहे. हीच गोष्ट गृहीत धरून व्हायाकॉम 18 ने पूर्ण विश्वासाने आपल्या 'मेरी कोम' चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख 2 ऑक्टोबर निश्चित केली आहे. चित्रपटात प्रियांका चोप्रा जागतिक मुष्टियुद्ध विजेती मेरी कोमची भूमिका साकारत आहे.
या चित्रपटाच्या युनिटशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, 'आम्ही फॉक्स स्टार इंडियामधील अंतर्गत सूत्रांकडून माहिती घेतली होती. त्यांनी सांगितले की, 2 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण चित्रपट तयार करण्याबाबत ते अस्वस्थ आहेत. जर यामध्ये काही गडबड झाली, तर चित्रपटाच्या गुणवत्तेबाबत तडजोड करावी लागेल. बॅँग बॅँगमध्ये स्पेशल इफेक्ट्स देण्यात येणार आहेत शिवाय पोस्ट प्रॉडक्शन संथ गतीने चालू आहे. आम्हाला विश्वास होता की हा चित्रपट निश्चित तारखेला प्रदर्शित होणार नाही. त्यामुळे आम्ही आमच्या चित्रपटाची घोषणा केली.'
याउलट फॉक्स स्टारच्या सूत्रांनी सांगितले की, 'आम्ही बँग बँगचे शुटिंग आणि एडिटिंग एकत्रच करत आहोत. कोणत्याही परिस्थितीत चित्रपट प्रदर्शित करण्याची ही तारीख आम्हाला चुकवायची नाही.' त्याच्या विरोधी 'मेरी कोम' चित्रपटाच्या सूत्रांनी प्रत्युतर देत सांगितले की, 'कोणत्याही परिस्थितीत बँग बँग वर्षाच्या शेवटपर्यंत तयार होऊ शकत नाही.'
जर असे झाले, तर प्रियांकाला कतरिनापासून सुटका मिळणार नाही. 2 आक्टोबरला कतरिनाचा 'फँटम' हा दुसरा चित्रपट प्रदर्शित होत असून यामध्ये सैफ अली खान अभिनेता आहे, तर दिग्दर्शन कबीर खान यांचे आहे. कबीरने सांगितले की, 'आम्ही 2 आक्टोबरच्या नियोजित शेड्युलनुसार काम करत आहोत. दुसर्‍या चित्रपटांची मला काही कल्पना नाही.'