मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा शुक्रवारी एका प्रीमिअम चॉकलेट बारच्या लाँचिंग इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. या कार्यक्रमाचे आयोजन हॉप्पीट्स ब्रॅण्डच्या वतीने मुंबईतील जुहूस्थित जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलमध्ये करण्यात आले होते.
यावेळी प्रियांका ग्रीन कलरच्या ड्रेसमध्ये ग्लॅमरस दिसत होती. फॅशन डिझायनर टोनीने तिचा हा ड्रेस डिझाइन केला होता. तिने केसांचा अंबाडा घातला होता. शिवाय रेड लिपस्टिकने
आपला हा लूक पूर्ण केला होता. प्रियांका हॉप्पीट्स कंपनीची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आहे.
प्रियांका सध्या 'बाजीराव मस्तानी' आणि 'दिल धडकने दो' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. तिचे हे दोन्ही सिनेमे पुढील वर्षी रिलीज होणार आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा इव्हेंटमध्ये पोहोचलेल्या प्रियांकाची खास झलक...