आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

UNICEFमध्ये म्हणाली प्रियांका, 'हिरोईन करतात FILM हिट, तरीदेखील हीरोपेक्षा मागे'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राचे वडिलांची आज पहिली पुण्यतिथी आहे. मागील वर्षी प्रियांकाच्या वडिलांचे निधन झाले होते. वडिलांच्या जाण्याने प्रियांका खूप खचली होती परंतु तिने स्वत: सावरले. ती आपल्या बळावर इंडस्ट्रीमध्ये नाव कमावत आहे. तिने काल एका महत्वपूर्ण कार्यक्रमात समील झाली होती. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांच्या बायोग्राफीच्या लाँचिंग इव्हेंटसह ती UNICEF (United Nations Children's Fund)च्या मुलींना भेटण्यासाठी गेली होती.
प्रियांका UNICEFच्या गुडविल अँबेसडर आहे. या संस्थेच्या वतीने आयोजित 'दीपशिखा' कार्यक्रमात सामील झाली होती. भारतात तरुणींना सक्षम बनण्याचा या कार्यक्रचा उद्देश आहे. प्रियांकाने यावेळी मुलींसोबत बॉलिवूडमध्ये महिला-पुरूष स्टार्सच्या कमाईमध्ये होणा-या असमानतातेविषयी बातचीत केली. ती म्हणाली, 'अभिनेत्यांना अभिनेत्रींच्या तुलनेत जास्त मानधन मिळते अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या मानधनामध्ये बरेच अंतर आहे. मला वाटते, की अभिनेत्री आता चांगले काम करतात. ज्या अभिनेत्रींनी मुख्य अभिनय केला आहे त्या सिनेमांना बॉक्स ऑफिसवर यशही मिळाले आहे.'
यावेळी प्रियांकाने आपल्या कुटुंबाविषयी सांगितले, ती या इव्हेंटमध्ये पांढ-या-सिल्वर रंगाच्या सुटमध्ये दिसली. प्रियांका सध्या जोया अख्तरच्या 'दिल धडकने दो' सिनेमाचे शुटिंग करत आहे. त्यानंतर प्रियांका अंधेरी परिसरात वडील डॉ. अशोक चोप्रा यांच्यासाठी आयोजित एका कार्यक्रमातसुध्दा पोहोचली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि UNICEF इव्हेंटमध्ये पोहोचलेल्या प्रियांका चोप्राची काही छायाचित्रे...