आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actress Priyanka Chopra Booked Charter Plane To Attend Salman Khan’S Sister Wedding

अर्पिताच्या लग्नात जाण्यासाठी प्रियांकाने बुक केले चार्टर्ड प्लेन, पाहा PIX

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(आई मधू चोप्रासोबत प्रियांका चोप्रा)
मुंबईः सलमान खानची बहीण अर्पिता हिच्या लग्नात सहभागी होण्यासाठी अनेक बॉलिवूड स्टार्स मुंबईहून हैदराबादला पोहोचत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने अर्पिताच्या लग्नात हजेरी लावण्यासाठी 'बाजीराव मस्तानी' या आगामी सिनेमाच्या शूटिंगपासून ब्रेक घेतला आणि आई मधू चोप्रा यांच्यासह हैदराबादला रवाना झाली. प्रियांकाने हैदराबादला जाण्यासाठी खास चार्टर्ड प्लेन बुक केले. मुंबई विमानतळावर तिला आईसोबत बघितले गेले.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'बाजीराव मस्तानी' या सिनेमातील एका महत्त्वाच्या सीनचे शूटिंग सुरु असताना तिला सलमान खानचा फोन आला. त्यानंतर काही वेळातच सलीम खान यांनीही फोन करुन प्रियांकाला लग्नाचे निमंत्रण दिले. खरे तर संजय लीला भन्साळी सिनेमातील कलाकारांना सुटी देण्याच्या मूडमध्ये नव्हते. मात्र प्रियांकाने संजय यांना गळ घालून परतल्यानंतर उर्वरित शूट लवकरात लवकर पूर्ण करणार, असा शब्द दिला.
लग्नात सहभागी होण्यासाठी तिने एक चार्टर्ड प्लेन बुक केले आणि आज दुपारी दोनच्या सुमारास ती आपल्या आईसह हैदराबादसाठी रवाना झाली.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा विमानतळावर क्लिक झालेली आईसोबतची प्रियांकाची छायाचित्रे...