आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियांका चोप्राने खरेदी केला 100 कोटींचा बंगला!, पाहा छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बातम्यांनुसार, प्रियांका चोप्राने वरील छायाचित्रात दिसत असलेला बंगला खरेदी केला आहे.)
मुंबई - अभिनेत्री प्रियांका चोप्राने एक आलिशान बंगला खरेदी केल्याची सध्या रिअल इस्टेटमध्ये बातमी पसरली आहे. मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी प्रियांकाला तिचे स्वप्नातील घर मिळाले आहे. तब्बल 100 कोटींना प्रियांकाने हा बंगला खरेदी केल्याचे म्हटले जाते. याच परिसरात म्हणे, अभिनेता हृतिक रोशनसुद्धा मागील काही दिवसांपासून बंगल्याचा शोध घेत आहे. मात्र प्रियांकाने बाजी मारत हृतिकपूर्वी आपला आशियाना शोधला.
गेल्या तीन वर्षांपासून प्रियांका सी-फेसिंग असलेल्या बंगल्याच्या शोधात होती. जेव्हा प्रियांकाने हा बंगला बघितला, तेव्हा आपला शोध पूर्ण झाल्याचे तिने म्हटले. हे घर अगदी आपले स्वप्नवत घर असल्याचे प्रियांकाने म्हटले आहे. गेल्या महिन्यात प्रियांकाने या बंगल्याची डील पूर्ण केली आहे. पूर्वी या बंगल्यात सिनेमाचे शूटिंग होत असे. या बंगल्याचा मालक हा बंगला शूटिंगसाठी भाड्याने देत होता.
या बंगल्याचे नाव 'दरिया महल' असून 1930मध्ये टेक्सटाईल व्यापारी माणिकलाल चुन्नीलाल चिनॉय यांनी हा बंगला बांधला होता. बाहेरुन या बंगल्याचा कलर पिवळा आहे. या बंगल्यात तब्बल 15 बेडरुम आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा बंगल्याची बाहेरुन क्लिक करण्यात आलेली निवडक छायाचित्रे...