आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Priyanka Chopra Dons Wedding Costume Of Mary Kom In Her Next Flick

बॉक्‍सर मेरी कोमच्‍या लग्‍नाच्‍या ड्रेसमध्‍ये दिसणार प्रियांका चोप्रा, पाहा VIDEO

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडमध्‍ये सध्‍या क्रीडापटूंवर चित्रपट निर्माण करण्‍याचा ट्रेंड सुरु आहे. असाच एक चित्रपट महिला बॉक्‍सर मेरी कोमवर निर्माण केल्‍या जात आहे. मेरी कोमच्‍या भूमिकेत प्रियांका चोप्रा दिसणार आहे. त्‍यासाठी प्रियांकाने चांगलीच मेहनत घेतली असून ती मेरी कोमच्‍या लग्‍नाचा ड्रेस परिधान करणार आहे.
चित्रपटामध्‍ये हुबेहुब मेरी कोम वाटण्‍यासाठी प्रियांकाने चक्‍क मेरी कोमचा लग्‍नाचा गाऊन मागविला आहे. अगदी तस्‍साच गाऊन डिझायनर रजतने तयार केला. चित्रपट निर्देशक ओमंग यांनी म्‍हटले आहे की, 'मेरी कोमवर आधारित चित्रपट असल्‍याने मेरीच्‍या लग्‍नाचा सीन घेण्‍यासाठी आम्‍ही मेरीने घातलेला गाऊनसारखाच गाऊन निर्माण केला आहे.'
डिझायनर रजतने म्‍हटले की, मेरीच्‍या ड्रेस सारखा हुबेहुब ड्रेस बनविने फार कठीण होते. परंतु आम्‍ही मेरीच्‍या लग्‍नाच्‍या ड्रेससाठी वापरण्‍यात आलेले मटेरियल वापरुन हा ड्रेस बनविला आहे.
पुढील स्‍लाइडवर पाहा, मेरी कोमच्‍या लग्‍नाचा गाऊन