आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Priyanka Chopra Escapes Death While At An Endorsement Shoot

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

थोडक्यात बचावली प्रियांका, अर्धा तास हवेत लोंबकळल्याने गुदमरला श्वास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा एका जाहिरातीच्या शुटिंग दरम्यान स्टंट करताना थोडक्यात बचावली आहे. या अपघातात प्रियांका जखमी झालेली नाही. मात्र, थोड्याशा हलगर्जीपणामुळे प्रियांकाच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता होती.

सेटवरील विश्वसनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रियंका जाहिरातीसाठी एक स्टंट करत होती. त्याच्या शुटिंगसाठी प्रियांकाला पोटाच्या सहाय्याने तारेच्या सहाय्याने कनेक्ट करण्यात आले. पण टेक्निशियनच्या बेजबाबदारपणामुळे तिला एरियल वायरने व्यवस्थित बांधण्यात आले नाही. त्यामुळे शुटिंगदरम्यान एरियल वायर लूज न झाल्याने प्रियांकाला हवेतच लोंबकळत राहावे लागले. प्रियांका सुमारे अर्धा तास तशीच लोंबकळत होती. नंतर घाईघाईने प्रियांकाला खाली काढण्यात आले. त्यावेळी श्वास गुदमरल्याने तिला श्वास घेण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे सेटवर सगळेच चिंतित होते. प्रियांकाला रुग्णालयात नेण्याची तयारी करण्यात आली, मात्र त्याची गरज पडली नाही. थोडा वेळ आराम केल्यानंतर तीची प्रकृती ठीक झाली.
त्यानंतर प्रियांकाने टेक्निशियनला वायर व्यवस्थित लावण्यास सांगितले. त्यानंतर टेक्निशियनने प्रियांकाची माफीही मागितली. नंतर त्या जाहिराताची पुन्हा शुटिंग करण्यात आली.
फाइल फोटो : 'खतरों के खिलाडी' शोच्या एका शुटींगदरम्यान प्रियांकाचा फोटो
पुढील स्लाइड्सवर पाहा.. प्रियंकाचे इतर काही फोटोज...