आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Priyanka Chopra Inaugurates 'Lieutenant Colonel Dr. Ashok Chopra Marg'

मुंबईच्या यारी रोडला प्रियांकाच्या वडिलांचे नाव, कार्यक्रमात पोहोचले चोप्रा कुटुंबीय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: 10 जून 2014 रोजी बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राचे वडील डॉ. अशोक चोप्रा यांची प्रथम पुण्यस्मरण होते. यानिमित्त मुंबईमध्ये आयोजित एका कार्यक्रमादरम्यान यारी रोडला डॉ. अशोक चोप्रा यांचे नाव देण्यात आले आहे. हा रस्ता प्रियांकाच्या घरासमोर आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी या रस्त्याचे उद्धाटन केले.
बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशनने आदर राखून रस्त्याला प्रियांकाच्या वडिलांचे नाव देण्याची परवानगी दिली. अंधेरी (पश्चिम)पासून काही अंतरावरच यारी रोड आहे. या रोडला आता डॉ. अशोक चोप्रा यांच्या नावाने ओळखले जाणार आहे. डॉ. अशोक चोप्रा यांचे एक वर्षापूर्वी 10 जून 2013ला निधन झाले होते. व्यवसायाने चिकित्सक अशोक चोप्रा 1997मध्ये भारतीय सेनेतून लेफ्टिनेंट कर्नलच्या पदावरून निवृत्त झाले होते. कर्करोगाने ते दिर्घकाळापासून आजारी होते. मुंबईच्या अंधेरी परिसरातील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये त्यांचे निधन झाले.
प्रियांकाने सांगितले, 'या रस्त्याविषयी मला मागील महिन्यात माहिती झाले होते. मला आणि माझ्या कुटुंबियांना ऐकून खूप आश्चर्य वाटले. आम्ही खूप भावूक झालो होतो. माझ्या वडिलांना सामाजिक कार्य करण्याची खूप आवड होती. हा रस्ता आमच्या घराच्या समोर आहे आणि त्याला माझ्या वडिलांचे नाव देण्यात आले हे माझ्यासाठी खूप भावूक क्षण आहेत. माझ्याकडे शब्दच उरले नाहीत.'
या कार्यक्रमात प्रियांका चोप्रासह आई मधु चोप्रा, भाऊ सिध्दार्थ चोप्रा, कजिन परिणीती चोप्रासुध्दा सामील होती. याव्यतिरिक्त प्रियांकाचे नातेवाईक आणि मित्र परिवारसुध्दा पोहोचले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून बघा या कार्यक्रमाची छायाचित्रे...