आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Priyanka Chopra Launches 3rd Single ‘ICMULM’

प्रियांकाने लाँच केले \'I Can’t Make You...\' गाणे, PIXमध्ये पाहा तिचा हटके अंदाज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने आयफा अवॉर्ड्स सोहळ्यात आपल्या सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकली. आपल्या आवाजानेही प्रियांका प्रेक्षकांवर भूरळ घालताना दिसत आहे. आता प्रियांकाने आपले तिसरे गाणे लाँच केले असून 'I Can’t Make You Love Me' हे या गाण्याचे शब्द आहेत. नोकिया मोबाइलच्या एका इवेंटमध्ये या गाण्याचे लाँचिंग करण्यात आले असून नोकियाच्या मिक्स रेडिओ अप्लिकेशनमध्ये हे गाणे दिसणार आहे.
नेहमी कूल लूकमध्ये दिसणारी प्रियांका या इवेंटमध्ये नेट स्कर्ट आणि टॉपमध्ये दिसली. यावेळी प्रियांकाने भरपूर प्रेक्षकांसमोर लाइव्ह परफॉर्मन्स दिला. उंच हिलचे सॅंडल घालून स्टेजवर आलेल्या प्रियांकाने या इवेंटची होस्ट अनुषा दांडेकरसोबत गाणे गायले. यावेळी प्रियांकाची आई मधु चोप्रा आणि भाऊ सिद्धार्थ चोप्राही इवेंटमध्ये हजर होते.
यावेळी प्रियांकाने आपल्या आई आणि भावासोबत मिळून शँपेनची बॉटल उघडली. 'I Can’t Make You Love Me' या गाण्याला यूट्युबवर आत्तापर्यंत 14 लाख लोकांनी पाहिला आहे असून त्याला 14 लाइक्स मिळाले आहेत. 28 एप्रिल 2014 रोजी प्रियांकाने हा व्हिडिओ यूट्युबवर अपलोड केला होता.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा नोकिया मिक्स रेडिओ इवेंटमधील प्रियांकाचा हटके अंदाज...