मुंबई- प्रियांका चोप्रा बुधवारी (17 डिसेंबर) GRAZIA मासिकाच्या लाँचिंग इव्हेंट सामील झाली होती. मासिकाने प्रियांकाला डिसेंबरसाठी कव्हर पेजवर स्थान दिले आहे. या लाँचिंग इव्हेंटचे आयोजन मुंबई रिलायन्स डिजिटलमध्ये करण्यात आले होते.
इव्हेंटमध्ये प्रियांका पोलका-डॉट स्वेटर आणि प्रिन्टेड स्कर्टमध्ये दिसली. हा ड्रेस Madison ब्रँडचा होता. तिन हाय हिल्स ब्लॅक कलरची Gucci ब्रँडची सँडल घातलेली होती. सोबतच, तिने हातात स्टाइलिश रिंग्ससुध्दा घातलेल्या होत्या. एक रिंग सापळ्याच्या (स्केलटन स्कल) चेह-याच्या आकाराची होती. प्रियांकाची हेअरस्टाइलसुध्दा खूप वेगळी होती.
प्रियांकाचा पुढील वर्षी जोया अख्तरच्या 'दिल धडकने दो' आणि संजय लिली भन्साळी यांच्या 'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसणार आहे. तिचा लास्ट रिलीज 'मेरी कोम' होता. त्यामध्ये तिच्या भूमिकेची खूप प्रशंसा झाली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा प्रियांका चोप्राची स्टाइलिश लूकमधील छायाचित्रे...