आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Priyanka Chopra Net Surfing For Fashion: Pria Kataria

या डिझाइनरने उलगडले प्रियांकाचे रहस्य, सांगितल्या आवडी-निवडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- प्रियांका चोप्रा डिझाइनर प्रिया कटारिया पूरीसोबत)
मुंबई- डिझाइनर प्रिया कटारिया पूरीने 'जंजीर' सिनेमात प्रियांका चोप्राची स्टाइल केली होती. दोघी दीड महिने एक6 राहिल्या आहेत. प्रियांकाला जवळून ओळखणा-या प्रियाने प्रियांकाच्या अनेक गोष्टी उमेश उपाध्याय यांना सांगितले.
फॅशनविषयी...
तिला फॅशनची ओळख आहे. ती नेटवर नेहमी शोधत असते, कुणी कोणती नवीन फॅशन केली आहे. मी प्रियांकामध्ये एक विशेष गोष्ट पाहिली आहे, की ती प्रयोग करण्यास आणि नवीन गोष्टी ट्राय करण्यासाठी मागे हटत नाही. अलीकडेच तिने आपल्या मोठ्या केसांना छोटे करून नवीन लूक दिला.
कोणताही ड्रेस परिधान करण्यासाठी प्रियांकाची फिगरसुध्दा फिट आहे. दुसरे ड्रेस परिधान करण्यासाठी विश्वास लागतो, तो प्रियांकामध्ये आहे. ती सहजरित्या कपडे सांभाळू शकते. म्हणून साडीपासून जीन्स, गाऊन, शॉर्ट्ससारख्या ड्रेसेसमध्ये ती सुंदर आणि आकर्षक दिसते. मला तिचे लेग्स खूप आकर्षक वाटतात. म्हणून मला तिच्यावर जीन्स, ट्राऊजर चांगली दिसती. मी सध्या तिच्यासोबत कोणत्याच सिनेमात काम करत नाहीये, परंतु रेड कार्पेटसाठी तिच्यासाठी डिझाईन करते.
फॅमिली गर्ल-
मला आठवते, की सिनेमाच्या शूटिंगदरम्यान तिच्या वडिलांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर उपचार चालू होते. ती तिच्या वडिलांसाठी खूप चिंतीत असायची. परंतु शॉट देण्याची वेळ आली, की ती योग्य तयारी करायची. नेहमी आपल्या कुटुंबीयांविषयी माहिती ठेवायची.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या प्रिया कटारिया पूरीने प्रियांका चोप्राविषयी काय सांगितले...