आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Fashion Update: प्रियांकाने भारतात आणला हुडी ड्रेसचा ट्रेंड, पाहा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही दिवसांपूर्वी फिल्मफेअर प्री-अवॉर्ड पार्टीत पोहोचलेल्या अभिनेत्री प्रियांका चोप्राने एक नवीन फॅशन ट्रेंड आणला. या पार्टीत प्रियांकाने फॉर्मल गाऊन किंवा पार्टी ड्रेस निवडण्यापेक्षा हुडी ड्रेस परिधान केला होता.
प्रियांकाने आणला नवीन ट्रेंड-
एलीना परसीलने डिझाइन केलेल्या या ऑफ व्हाइट ड्रेसचा हाय-लो फॉल फिरवून प्रियांकाने पोज दिल्या. त्यासोबतच तिने आपल्या आवडत्या ब्रँड क्रिस्टियान लाबुटिनोचा क्लच आणि मॅचिंग पम्प्स घातले होते. प्रियांकाच्या या ट्रेंडनंतर बॉलिवूडमध्ये या ड्रेसची फॅशन वाढली आहे. हुडी ड्रेस परिधान करणारी प्रियांका पहिलीच अभिनेत्री आहे.
पदराचे नवीन रुप आहे हुडी-
या ट्रेंडविषयी डिझाइनर नचिकेत बार्वेचे म्हणणे आहे, 'हुडी पदराचे नवीन रुप आहे. हुडी लूकमध्ये भर टाकतो. हुडीला सांभाळणे थोडे कठिण जाते, मात्र प्रियांकाने अलगद सांभाळले. वसार्चेने आपल्या स्प्रिंग 2014 कलेक्शनमध्ये हुडी गाऊन, जॅकेट्सचे अनेक प्रकार सादर केले होते. यापूर्वी हॉलिवूड अभिनेत्री लेडी गागा, रीटा ओरा, निक मिनाज यांनी हुडी ड्रेस परिधान केले आहेत.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा हुडी ड्रेसमधील प्रियांकाचा लूक...