आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Priyanka Chopra Shoots For 16 Hours Non Stop Mary Kom

प्रियांकाने न थांबता 16 तास केले 'मेरी कॉम'चे शुटिंग, जाणून घ्या का?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रियांका चोप्रा आणि 'मेरी कॉम' सिनेमाची टीम शुटिंगचे वेळापत्रक वेळेत पूर्ण करण्यात कोणतीही कसर शिल्लक सोडत नाहीये. याच प्रयत्नात रविवारी (13 एप्रिल) प्रियांका आणि सिनेमाच्या टीमने धर्मशाळेमध्ये 16 तास सतत शुटिंग केले. यावेळी लंच, डिनर किंवा चहाचा ब्रेकसुध्दा घेण्यात आला नाही.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांका 'मेरी कॉम'साठी मागील काही आठवड्यांपासून सतत शुटिंग करत आहे. सुरूवातीला त्यांनी मनालीमध्ये शुटिंग केले. त्यानंतर हिमाचल प्रदेशाच्या काही भागातील धर्माशाळेमध्ये वेळापत्रक ठरविण्यात आले. रविवारी धर्मशाळेमध्ये कडाक्याच्या थंडीत प्रियांका आणि सिनेमाच्या टीमने शुटिंग पूर्ण केले. त्यानंतर तिथे अचानक पाऊस पडायला लागला.
पाऊस जोरात पडत असल्याने सिनेमाची टीम गोंधळात पडली. कारण वेळपत्रकात बदल करणे कठिण होते. त्यामुळे दिग्दर्शक ओमंग कुमारने ठरवले, की कोणताही ब्रेक न घेता 12 तासांमध्ये ठरलेलल्या वेळापत्रकाचे शुटिंग पूर्ण करायचे.
सुत्रानी सांगितले, की जेव्हा ही गोष्ट प्रियांकाला सांगण्यात आली तेव्हा तिने ब्रेक न घेता शुटिंग करणार असल्याचे सांगितले. जेवण आणि चहाच्या ब्रेकमध्ये कमीत-कमी एक तासांचा वेळ जातो. म्हणून तिने सांगितले, 'आपल्या टीमकडे जेवण करण्यास वेळ नाहीये, तर मीही काही न खाता शुटिंग पूर्ण करेल'. टीमने तिला सतत काहीतरी खाण्याचा आग्रह केला पण प्रियांकाने आपला शब्द मोडला नाही.
प्रियांका चोप्राने सांगितले, की बॉक्सिंगची ट्रेनिंग घेतल्यानंतर तिला एवढा थकवा सहन करण्याची शक्ती मिळाली आहे. तिने केवळ ज्यूस पिऊन शॉट्स दिले आणि शुटिंग पूर्ण झाल्यानंतर तीन तासांनी जेवण केले. शुटिंगच्या ठिकाणापासून तिचे हॉटेल तीन किलोमीटर अंतरावर होते.
प्रियांकाच्या प्रवक्त्याने सांगितले, 'ती खूपच मेहनती आहे. 'मेरी कॉम'मध्ये आपले पूर्ण योगदान देण्याचा तिचा नेहमीच प्रयत्न असतो. तिच्यासाठी हा सिनेमा शारीरिक रुपातच नव्हे तर मानसिक रुपातसुध्दा एक आव्हान आहे. ती या सिनेमाला वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून तिने सतत काम केले.'
प्रियांका चोप्रा अभिनीत 'मेरी कॉम' हा सिनेमा रिअल हीरोइन 'मेरी कॉम'च्या जीनवपटावर आधारित आहे. संजय लीला भन्साळी यांच्या बॅनर खाली बनलेल्या या सिनेमात प्रियांका बॉक्सिंग चॅम्पिअनच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन ओमंग कुमार करत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा मनालीमध्ये शुटिंग करत असलेल्या प्रियांकाची काही छायाचित्र आणि सोबतच बघा मेरी कॉमसोबतची तिचे PICS...
शुटिंगची छायाचित्रे प्रियांकाच्या चाहत्यांनी सोशल साइट्सवर अपलोड केली आहेत.