आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Priyanka Chopra Takes Action Against The Spa Owner Who Ran A Sex Racket On Her Property

सेक्स रॅकेटः स्पाच्या मालकाला प्रियांका चोप्राने बजावली कायदेशीर नोटीस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोः सलमान खानसोबत काळ्या सूटमध्ये दिसणारा व्यक्ती हा माणिक सोनी असून तो मुंबईस्थित स्पामध्ये सेक्स रॅकेट चालवत असल्याचे उघड झाले आहे. माणिक सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.)

मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राची आई डॉ. मधू चोप्रा यांच्या वर्सोवा स्थित कमर्शिअल फ्लॅटमध्ये स्पा सेंटरआड सेक्स रॅकेट चालवणारा स्पा सेंटरचा संचालक माणिक सोनी अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. सोनीचे करिश्मा स्पा सेंटर नावाने अनेक शहरांमध्ये शाखा आहेत. अभिनेत्री प्रियांका चोप्राने आरोपी स्पा सेंटरचा मालक माणिक सोनीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रियांकाने माणिक सोनीला कायदेशीर नोटीस बजावली आहे. एका वृत्तपत्राशी बोलताना प्रियांकाची आई डॉ. मधू चोप्रा यांनीही माणिक सोनीला नोटीस बजावली असल्याचे स्पष्ट केले आहे.
अनेक बड्या अभिनेत्यांशी आहे माणिक सोनीची ओळख...
स्पा सेंटरच्या इतर शहरांमधील शाखांमध्येसुद्धा सेक्स रॅकेट चालत होतं का? याचा तपास पोलिस करत आहेत. सोनीने स्पाच्या वेबसाइटवर जी छायाचित्रे पोस्ट केली आहेत, त्यावरुन त्याचे स्टाँग कनेक्शन आणि तो श्रीमंत असल्याचे दिसून येत आहे. त्याने आपल्या स्पामध्ये सलमान खान, जितेंद्र, सोहेल खान, राजीव खंडेलवाल, युवराजसिंग, हरभजनसिंग, इरफान पठाण, श्रीसंतसह अनेक सेलिब्रिटींना आमंत्रित केले होते. या सर्वांसोबतची छायाचित्रे त्याने आपल्या वेबसाइटवर लावली आहेत.

याशिवाय स्पाच्या वेबसाइटवर त्याने अनेक व्हिडिओज अपलोड केले आहेत. यामध्ये तो मोठ्या सेलिब्रिटींसोबत दिसत आहे. वेबासाइटवर 'About Us' या सेक्शनमध्ये या स्पाला माणिक सोनीची कल्पना असल्याचे सांगितले गेले आहे. त्याच्या वेबसाइटवर लिहिण्यात आले आहे, "Having explored the spa industry for over 12 years, it is my pleasure to bring to you the amalgamation of luxury and holistic treatments under one roof, which is Charisma Spa & Salon in Bangalore & Mumbai".

सोनीच्या स्पामध्ये या सेलिब्रिटींची हजेरी म्हणजे अनेक सेलिब्रिटींसोबत त्याचे चांगले संबंध असल्याचे स्पष्ट करते. याशिवाय फिल्म इंडस्ट्रीतील पेज थ्री पार्टीमध्येही माणिक सोनीचे येणे-जाणे आहे. पोलिस या सेक्स रॅकेटशी संबंधित ग्राहकांचा शोध घेत आहे. या ग्राहकांमध्ये मोठी नावे असल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, आरोपी माणिक सोनीची सेलिब्रिटींसोबतची छायाचित्रे...