आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानच्या 'किक'मध्ये दीपिका नव्हे प्रियांका करणार आयटम नंबर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाहरुखच्या टीमधील लोक सलमान खानच्या दिशेने वळताना दिसत आहेत. यावेळी साजिद नाडियाडवाला यांचा आधार आहे. त्यांचा 'किक' सिनेमामध्ये एक आयटम साँग करण्यासाठी सुरूवातीला दीपिका पदुकोणशी संपर्क साधण्यात आला होता. परंतु ती सध्या शाहरुख खानच्या 'हॅप्पी न्यू इअर'मध्ये बिझी असल्याने तिने नकार दिला आहे. प्रियांका आणि शाहरुख खानची मैत्री बॉलिवूडमध्ये चांगलीच प्रसिध्द आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साजिद यांना मुख्य नायिकेकडूनच गाणे करायचे आहे. दीपिकानंतर करीना कपूरचा नंबर येतो. परंतु तिच्या कमी झालेल्या स्टारडममुळे तिचा विचार करण्यात आलेला नाहीये. आता कतरिनाविषयी बोलायचे झाले तर, ती सध्या रणबीरच्या नात्यात सर्वजनिकरित्या अडकलेली आहे. म्हणून तिच्या नावाचा विचारच करण्यात आलेला नाहीये. प्रियांकाने संजय भंसाळीच्या सिनेमामध्ये पेपी नंबर 'राम चाहे लीला चाहे' केले होते. याकडे बघता तिचे नाव पुढे येत आहे.
तसे निर्मिता साजिदसह प्रियांकाचे संबंध करिअरच्या सुरूवातीपासून चांगले आहेत. साजिद यांनी 'मुझसे शादी करोगी'मध्ये प्रियांकाला मोठा ब्रेक दिला होता. तिच्या आणि प्रकाश जाजूमधील मतभेदांना साजिदनेच दूर केले होते.
'हायवे', '2 स्टेट्स'नंतर आता साजिदचा 'हीरोपंती'सुध्दा या वर्षीच्या हिट सिनेमांमध्ये सामील झाला आहे. ते 'किक'चे निर्मातसुध्दा आहे आणि पदार्पण दिग्दर्शकसुध्दा आहेत.

यामुळे सिनेमा खूप महत्वपूर्ण होणार आहे. लवकर शाहरुखची मैत्रीण प्रियांका सलमानसह ठुमके लावताना रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. सुत्रांच्या सांगण्यानुसार, प्रियांका लवकर आपला निर्णय सलमान आणि साजिद यांना सांगाणार आहे.