आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Priyanka Chopra\'s Marykom To Release On 5 September

जाणून घ्या, वेळेपूर्वीच का रिलीज होतोय प्रियांकाचा \'मेरी कोम\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गेल्या काही महिन्यांपासून 'हैदर', 'बँग बँग' आणि 'मेरी कोम' हे तीन बिग बजेट आणि बिग स्टारकास्ट असलेले सिनेमे 2 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार असल्याची चर्चा आहे. प्रियांका चोप्रा मात्र यादिवशी हृतिक, कतरिना आणि माजी प्रियकर शाहिद कपूर यांच्याशी सामना करु इच्छित नाहीये. यासाठी तिने 'मेरी कोम' या सिनेमाची रिलीज डेट बदलण्याची इच्छा व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे प्रियांकाची ही इच्छा पूर्ण होताना दिसत आहे.
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या सिनेमाच्या निर्मात्यांनी हा सिनेमा महिनाभरापूर्वी रिलीज करण्याचे ठरवले आहे. आता हा सिनेमा 2 ऑक्टोबर ऐवजी 5 सप्टेंबरला रिलीज होणार आहे.
प्रियांका आपल्या या सिनेमाकडे 'कहानी' आणि 'द डर्टी पिक्चर' यांसारख्य स्त्री केंद्रित सिनेमांप्रमाणे बघत आहे. बर्फी या सिनेमात उत्कृष्ट अभिनयाचा नमुना सादर करणारी प्रियांका 'मेरी कोम'कडे मोठ्या आशेने बघत आहे. हा सिनेमा करिअरला वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल, असे प्रियांका वाटत आहे.
व्हायकॉम 18 या सिनेमाची निर्मिती कंपनी असून या सिनेमा प्रोमो एखाद्या मोठ्या सिनेमासोबत रिलीज करु इच्छित आहे. सध्या सलमानचा किक हा मोठा सिनेमा रिलीजच्या मार्गावर आहे. मात्र यूटीव्ही हा प्रतिस्पर्धी निर्मिती स्टुडिओ 'किक'चा निर्माता आहे. त्यामुळे व्हायकॉम यासाठी प्रियांकाची मदत घेत आहे. किकचे दिग्दर्शक साजिद नाडियाडवाला प्रियांकाचे चांगले मित्र असून त्यांनीच तिला 'मुझसे शादी करोगे' या सिनेमात मोठा ब्रेक दिला होता. प्रियांका यासाठी आता साजिदशी बोलणी करणार आहे.
गेल्यावर्षी 5 सप्टेंबर रोजी प्रियांकाचा 'जंजीर' आणि परिणीती चोप्राचा 'शुद्ध देसी रोमान्स' हा सिनेमा रिलीज झाला होता. परिणीतीचा सिनेमा हिट तर प्रियांकाचा फ्लॉप ठरला होता. यावर्षी 5 सप्टेंबरला पुन्हा एकदा परिणीतीचा सिनेमा प्रियांकाच्या सिनेमासह रिलीज होणार आहे.
परिणीती आणि आदित्य रॉय कपूर यांचा 'दावत-ए-इश्क' हा सिनेमा 'मेरी कोम'सह रिलीज होणार आहे. त्यामुळे गेल्यावर्षीप्रमाणे पुन्हा एकदा दोन्ही बहिणींच्या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे.