(अभिनेत्री लीना चंदावरकरसोबत केक कापताना पीआरओ राजू करिया)
मुंबई- पीआरओ राजू करियाने मंगळवारी (11 नोव्हेंबर) एका पार्टीचे आयोजन केले होते. त्यामध्ये बॉलिवूडचे अनेक सेलेब्स सामील झाले होते. दोन महिन्यांपूर्वी 17 ऑगस्ट रोजी मीडियामध्ये फिल्मी इंडस्ट्रीचे सीनिअन पीआरओ राजू करियाचे निधन झाल्याची बातमी आली होती. मात्र, तो जिवंत असल्याचे उघड झाले.
आपली निधन वार्ताच्या अफवांना पूर्णविराम लावण्यासाठी त्याने एक पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत बॉलिवूड स्टार्सनीसुध्दा उपस्थिती लावली. यावेळी अभिनेत्री लीना चंदावरकर, डॉली बिंद्रा, राहूल रॉय, शिवा रिंदानीसह अनेक सेलेब्ससुध्दा दिसले. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती, की राजूचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याच्या निधनाच्या वार्ता ऐकून इंडस्ट्रीमधील काही कलाकारांनी दु:खद प्रतिक्रियासुध्दा दिल्या होत्या.
तरुणीने पसरवली होती मृत्यूची अफवा
Divyamarathi.comशी बातचीत करताना राजूने मृत्यूच्या पसरलेल्या अफवाविषयी सांगितले, 'ती घटना खूपच हास्यास्पद आहे. ब्रेन सर्जरीसाठी मी अमरावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालो होतो. 9 ऑगस्टपासून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होता. त्यावेळी डॉक्टरांना फोन बंद करून आराम करण्यास सांगितले. त्यावेळी त्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असलेल्या एका रुग्णाच्या पाहूण्यांनी माझा फोन चोरला. माझ्या फोनवर आलेल्या फोनवर एका तरुणीने सांगितले, की त्यांचे निधन झाले. त्यानंतर निधनाची बातमी सर्व माध्यमांमध्ये हवेसारखी पसरली.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा राजू करियाने आयोजित केलेल्या पार्टीचे Pics...